चंद्रपुरात क्षुल्लक वादातून पत्नीवर सत्तुरने प्राणघातक हल्ला • बाबुपेठ परिसरातील घटना • पती पसार, शहर पोलिसात गुन्हा दाखल

चंद्रपुरात क्षुल्लक वादातून पत्नीवर सत्तुरने प्राणघातक हल्ला

• बाबुपेठ परिसरातील घटना
• पती पसार, शहर पोलिसात गुन्हा दाखल

चंद्रपुरात क्षुल्लक वादातून पत्नीवर सत्तुरने प्राणघातक हल्ला • बाबुपेठ परिसरातील घटना • पती पसार, शहर पोलिसात गुन्हा दाखल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 1 जुलै
क्षुल्लक वादातून पत्नीवर सत्तुरने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली. याप्रकरणी शहर पोलिसांनी शशिकांत विठ्ठल पेंदोर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार आरोपीचा शोध शहर पोलिस घेत आहेत. ही घटना रविवार, 30 जून रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.
पेंदोर कुटुंबिय बाबुपेठ परिसरातील नेताजी चौकात वास्तव्यास आहेत. मुलगा एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. वाढदिवस साजरा करून तो घरी परतला. पण, कपडे बदलवत असताना त्याच्या खिशातून लायटर खाली पडले. यावरून पती-पत्नीमध्ये शाब्दीक वाद झाला. लगेच मुलगा मित्रांसोबत बाहेर गेला. पुन्हा पतीने पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर पत्नीने मुलाला घरी बोलावले. तरीही राग अनावर झाल्याने पतीने पत्नीवर सत्तुरने हल्ला केला. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी माय-लेक घराबाहेर पडले. आम्हाला वाचवा, अशी आरडाओरड केली. नेताजी चौकात बसलेल्या युवकांनी पतीला हाकलून लावले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीवर महिलेला रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या प्रकरणी पतीविरूद्ध भादंवि 307 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पसार आरोपीचा शोध शहर पोलिस घेत असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here