अकोला कृषी विद्यापीठाचे कार्य अभिमानास्पद व प्रशंसनीय: मा.आ. गोपीकिशन बाजोरिया विदर्भातील शेती व शेतकरी संपन्नतेसाठी कृषी विद्यापीठाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य मिळवून देऊ: मा.आ. अमोल दादा मिटकरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात "कृषि दिन"उत्साहात साजरा
अकोला कृषी विद्यापीठाचे कार्य अभिमानास्पद व प्रशंसनीय: मा.आ. गोपीकिशन बाजोरिया विदर्भातील शेती व शेतकरी संपन्नतेसाठी कृषी विद्यापीठाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य मिळवून देऊ: मा.आ. अमोल दादा मिटकरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात "कृषि दिन"उत्साहात साजरा

अकोला कृषी विद्यापीठाचे कार्य अभिमानास्पद व प्रशंसनीय: आ. गोपीकिशन बाजोरिया

विदर्भातील शेती व शेतकरी संपन्नतेसाठी कृषी विद्यापीठाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य मिळवून देऊ: आ. अमोल दादा मिटकरी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात “कृषि दिन”उत्साहात साजरा

अकोला कृषी विद्यापीठाचे कार्य अभिमानास्पद व प्रशंसनीय: मा.आ. गोपीकिशन बाजोरिया विदर्भातील शेती व शेतकरी संपन्नतेसाठी कृषी विद्यापीठाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य मिळवून देऊ: मा.आ. अमोल दादा मिटकरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात "कृषि दिन"उत्साहात साजरा
अकोला कृषी विद्यापीठाचे कार्य अभिमानास्पद व प्रशंसनीय: मा.आ. गोपीकिशन बाजोरिया

मुकेश शेंडे
तालुका प्रतिनिधि सिंदेवाही मिडिया वार्ता न्यूज
9011851745

सिंदेवाही: -महाराष्ट्र राज्याचा विचार करता कृषिविषयक शिक्षण,संशोधन व विस्तार कार्य या तीनही बाजूवर अकोला कृषी विद्यापीठाचे कार्य निश्चितच अभिनंदनीय व प्रशंसनीय असल्याचे गौरवास्पद प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे मुख्य प्रतोत (राज्यमंत्री दर्जा) तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी केले. हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे आयोजित “कृषी दिन” कार्यक्रमाचे प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचा सदस्य या नात्याने या विद्यापीठाचे कार्य जवळून बघण्याची संधी प्राप्त झाली आणि विद्यापीठ कार्याचा जवळून अभ्यास करता आला,विविध समस्यांचे संकट असताना सुद्धा विद्यापीठातील प्रत्येक घटकाने आपले कार्य सचोटीने पार पाडत या विद्यापीठाला एक लौकिक प्राप्त करून दिला याची जाणीव असल्याचे सांगतानाच आ. बाजोरिया यांनी विद्यापीठाच्या प्रगतीत अडसर ठरणाऱ्या समस्यांवर विविध पातळीवर प्रयत्नांद्वारे मात करण्याचे धोरण असल्याचे नमूद केले व विद्यापीठाच्या शासन दरबारी प्रलंबित विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मकतेने प्रयत्नांची पराकाष्टा करत या विद्यापीठाला अधिक सक्षम करण्याचा निर्धार आपल्या मनोगतात व्यक्त केला. विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित या अतिशय महत्त्वाकांक्षी “कृषी दिन” कार्यक्रमाचे प्रसंगी महाराष्ट्र शासनाद्वारे सन 2018 व 2019 या व
दोन वर्षात पुरस्कृत केलेले कृषिभूषण पुरस्कार , उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार , डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त विदर्भातील एकूण 26 शेतकरी बंधू-भगिनींना आज सन्मानित करण्यात आले. covid-19 च्या पार्श्वभूमीवर हायब्रीड मोडमध्ये म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमाचे प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. आ. अमोलदादा मिटकरी यांचेसह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य सर्वश्री मा.श्री. गणेश कंडारकर, मा.श्री. मोरेश्वर वानखेडे, मा. श्रीमती डॉ.अर्चना बारब्दे, मा.श्री विनायक सरनाईक (आभासी माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथून सहभागी), मा.श्रीमती स्नेहा हरडे (आभासी माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथून सहभागी ) जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ मा.डॉ.चारुदत्त मायी (आभासी माध्यमातून कृषी महाविद्यालय नागपूर येथून) उपस्थित होते. कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या मुख्य सोहळ्याचे प्रसंगी विद्यापीठातील नुकतेच सेवानिवृत्त झालेले संचालक विस्तार शिक्षण मा. डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे,अधिष्ठाता कृषी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर,अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ.प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांची सभागृहात उपस्थिती होती. विधान परिषदेचा सदस्य या नात्याने राज्य शासनाने या विद्यापीठाचा कार्यकारी परिषद सदस्य म्हणून माझी निवड सार्थकी लावण्यासाठी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सध्या विद्यापीठाच्या क्षमता, उपलब्धी व समस्या यांचा प्रत्यक्ष विभागांना भेटी द्वारे अभ्यास करीत असून विद्यार्थी घडविण्या सोबतच कृषी संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये या विद्यापीठाच्या प्रत्येक विभागाचे कार्य सर्वांनीच पहावे असे आहे असे गौरवपूर्ण उद्गार मा. आ. अमोलदादा मिटकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या या उपलब्धीचा फायदा घेण्यासाठी विद्यापीठाला भेट द्यावी विभागनिहाय आपल्या समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठांमध्ये नियोजन करण्यात आले आहे याचा सुद्धा आपण फायदा घ्यावा असे शेतकरी बांधवांना आवाहन करतानाच कोरोना लॉक डाउन चे कालखंडात शैक्षणिक संस्थांचा विचार करता केवळ कृषी विद्यापीठ अहोरात्र कार्यरत होते असे सांगतानाच शासनाचा प्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या समस्यांना शासनदरबारी मांडत त्यावर समाधान शोधण्यासाठी तत्पर असल्याचे सुद्धा आ मिटकरी यांनी सभागृहाला आश्वस्त केले. कृषी विद्यापीठाद्वारे शेती आणि शेतकरी संपन्नतेसाठी करण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, विविध विभागांचे सहयोगातून शाश्वत ग्रामविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, कौशल्य प्राप्ती सह ग्रामीण रोजगार निर्मिती साठी विविध उपक्रमांचे आयोजन आदींविषयी आपले अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सविस्तर माहिती उपस्थित सभागृह तथा शेतकरी बांधवांना दिली. या विद्यापीठाने कालसुसंगत संशोधना सह कृषी शिक्षणाचे माध्यमातून हजारो युवकांना कृतीयुक्त शिक्षित केले असल्याचे समाधान असून विदर्भ प्रदेश सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठाची कटिबद्धता व्यक्त केली व कुठल्याही शाखेतील पदवीका अथवा पदवीधरांना शेती क्षेत्रामध्ये रोजगार तथा स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव असून यासंबंधी विद्यापीठांमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय श्री गणेश कंडारकर, श्री मोरेश्वर वानखेडे,डॉ.अर्चना बारब्दे, पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री विनोद इंगोले श्री गोपाल हागे तथा सौ सरला मोहिते यांनी समयोचित विचार मांडले. कृषी दिनाचे आयोजना संदर्भात संचालक विस्तार शिक्षण डॉ.विलास खर्चे यांनी आपले प्रास्ताविकात सविस्तर निवेदन केले. याप्रसंगी अकोला मुख्यालयी अकोला वाशिम जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी सर्वश्री. विनोद ज्ञानदेव इंगोले (मु.धाकली. ता.बार्शीटाकळी जि.अकोला), श्री गोपाल जगन्नाथराव हागे (मु.केशव नगर, जि.अकोला), सौ सरला रमेश मोहिते( मु. सोनखास ता. मंगरूळपिर, जि. वाशिम) यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र तथा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तर आभासी माध्यमातून कृषी महाविद्यालय नागपूर येथून विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ मा. डॉ.चारुदत्त मायी यांच्या शुभहस्ते, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ.अरुण इंगोले यांचे प्रमुख उपस्थितीत नागपूर तथा वर्धा जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी सर्वश्री श्री निळकंठ विठ्ठलराव कोडे, (मु.पो.धापेवाडा,ता.कळमेश्वर, जि. नागपूर), श्री अण्णास्वामी रामभाऊ कोडापे, (मु. पो.जामखेड, ता. उमरेड जि. नागपूर), श्रीमती सुनंदा संतोषराव सालोडकर, (मु. सोनेगाव पो. कळमेश्वर, जि.नागपूर), श्री बळवंत सदाशिव डडमल (मु. मांडवा, पो. आमगाव,ता.हिंगणा जि. नागपूर), श्री सुनील मारोतराव कोंडे (मु. सावंगी, ता. कळमेश्वर,जि. नागपूर )व श्री ज्ञानदेव दौलत बनाशिंगे (मु. कोची ता.सावनेर जि.नागपूर )यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथून आभासी पद्धतीने विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा.श्री. विनायक सरनाईक यांचे शुभहस्ते, कार्यक्रम समन्वयक डॉ. चंद्रकांत जायभाये यांचे प्रमुख उपस्थितीत श्री प्रल्हाद संपत गवते (मु.मंगरुळ,ता.चिखली, जि. बुलढाणा) तथा सौं.अनिता रामसिंग पवार (मु. मलगी, ता.चिखली जि. बुलढाणा) या शेतकरी बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तर कृषी विज्ञान केंद्र,सोनापुर, गडचिरोली येथून आभासी पद्धतीने विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय सौं स्नेहा हरडे यांचे शुभहस्ते कार्यक्रम समन्वयक इंजि.संदीप कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ प्रतिभा प्रभाकर चौधरी (मु. नवेगाव ता.जि. गडचिरोली )यांचा सन्मान करण्यात आला. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र अमरावती येथून प्रभारी अधिकारी डॉ. सतीश निचळ यांच्या शुभहस्ते शेतकरी सर्वश्री श्री प्रफुल्ल गणपतराव हेरोडे ( मु. पो.ओमनगर ता.मोर्शी, जि. अमरावती), श्री किसना भुऱ्या कास्देकर (मु.बारू, ता. धारणी जि.अमरावती ),डॉ. शशीभूषण भाऊराव उमेकर (मु.पो. टेंभुरखेड ता. वरुड जि. अमरावती) यांचा सन्मान करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथून जिल्हाधिकारी मा.श्री अमोल येडगे यांचे शुभहस्ते, कार्यक्रम समन्वयक डॉ.सुरेश नेमाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पांचाळ साहेब,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. के. डी.ठाकूर, कृषी अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर. एन.काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री जगदीश हरिदास चव्हाण (मु.गाजीपूर,ता. दारव्हा, जि. यवतमाळ) व श्री महेंद्र दौलत नैताम (मु. खैरगाव ता.केळापूर.जि. यवतमाळ) यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र गोंदिया येथून आभासी माध्यमातून कार्यक्रम समन्वयक डॉ. नरेंद्रकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री ऋषिकुमार युवराज टेंबरे (मु.पो. चुटिया ता. जि. गोंदिया) श्री प्रवीण देविदास कापगते (मु. सिंधीपार ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया) व श्री दुलीचंद नारायण पटले (मु.बिरिया,ता. तिरोडा जि. गोंदिया) यांचा सत्कार करण्यात आला. तर भंडारा जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री तानाजी गोपाल गायधने (मु. चिखली ता. जि. भंडारा) श्री विष्णू रामभाऊ आथीलकर (मु. नेरी ता.मोहाडी जि. भंडारा )श्री घनश्याम बळीराम पारधी (मु.किनी ता. साकोली जि.भंडारा) यांचा कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे कार्यक्रम समन्वयक डॉ. निलेश वजीरे तथा कृषी संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. श्यामकुवर यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेले शेतकरी श्री दिलीप नामदेवराव शेंडे (मु. मेंढा ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर)व श्री गुरुदास अर्जुन मसराम (मु. पांढरवाणी ता.शिंदेवाही जि. चंद्रपूर) यांचा कार्यक्रम समन्वयक डॉ. विनोद नागदेवते आणि संशोधन केंद्र प्रमुख डॉ अनील कोल्हे यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. कृषी दिन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालनालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here