स्पॉटलाईट: मुलांमध्ये संस्कार पेरतांना

अंंकुश शिंगाडे

मो:९३७३३५९४५

आज सावित्रीबाई फुलेंचं नाव जगात आहे. जिनं स्वतः संकटं झेलून बंद पडलेल्या स्री शिक्षणाला चालना दिली व त्यांच्यात आदर्श संस्कार फुलवलेत. ते आदर्श संस्कार यासाठी तिनं महिलांमध्ये फुलवलेत की त्यामुळं त्या ज्या बाळांना जन्म देतील. ती बाळंही आदर्श संस्काराचे होतील व पुढं समाज आदर्श बनेल व त्याबरोबर देशही. त्या केवळ या महिलांच्या आदर्श गुरुच बनल्या नाहीत तर त्या आदर्श माताही बनल्या.

             अलीकडील काळ पाहिला तर आज कोणीही आदर्श राहिलेलं नाही. ना आजची माता आदर्श राहिलेली आहे. ना तिचा पुत्र ना तिची पुत्री. आज आईच आपल्या जन्मदात्या पुत्रासमोर आदर्श दाखवत नाही तर तिचे पुत्र कसे आदर्शस बनतील. हेही एक कोडेच आहे.

           ज्याप्रमाणे कधीकधी आई आदर्श दिसत नसते. त्याचप्रमाणे पिताही आदर्श दिसत नसतो. त्यामुळं येणारी ही त्याची पिढी कशी आदर्श दिसेल! असा आदर्श माता पित्याचा सहवास असतांना आपण लोकांकडून आदर्श पुत्राची अपेक्षा कशी काय करुल शकतो. करुच शकत नाही.

          वास्तवीक जीवनात आपण पाहतो की काही माणसं ही सतत दारुच्या आहारी गेलेली असून ती मंडळी दारु पिवून घरी येत असतात. काही काही माणसं खर्रेही खात असतात. काहीकाही लोकं चो-या करीत असतात. हे सर्व त्यांची मुलं पाहात असतात. त्यातील काही अपवाद जर सोडली तर बरीचशी मुलं ही आपले वडील जे काम करतात, त्यांंचं अनुकरण करीत असतात. जर त्यांचे वडील दारु पीत असतील तर ती मुुलंही दारु प्यायला शिकतात.

          ते वडील जुवारी असतील तर ती मुलंही जुवारी बनतात. तसेच ते पिते व्याभिचैरी असतील तर मुलंही व्याभिचारी. याचाच अर्थ असा की एक पिता जर आपली पत्नी सोडून (त्या बाळाची आई) जर दुस-या परस्रीसोबत फिरत असेल तर ती मुलं अशा बापापासून कोणता आदर्श बोध घेतील? कोणताच नाही. उलट त्या मुलांवर त्या कोवळ्या वयात तेच व्याभिचाराचे संस्कार होत असतात व तेच व्याभिचार पद्धतीनं वागत असतात. 

          काही काही महिलाही व्याभीचार करतांना दिसतात. त्यांना पती असतांनाही त्या स्रिया पतीव्रत न वागता परपुरुषांसोबत बिनधास्त फिरत असतात. अशा महिलांकडून त्यांच्या मुलांनी कोणता बोध घ्यावा. ते कोणताच बोध घेवू शकत नााहीत. उलट त्यांचं अनुकरण करणं,सुरु होतं व त्या मात्यापित्यांनी आपल्या मुलांना चांगलं बनविण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं बनविण्यासाठी जर शब्दांची ओढाताण केली तर अशी मुलं आपल्या मायबापाला लहानवयापासूनच खडे बोल सुनावीत असतात.

          निसर्गनियमच आहे की जे पेराल, तेच उगवेल. जर गहू पेरला तर धान उगवणार नाही. त्यामुळं आपल्या पुत्रांना आदर्श बनवायचं असेल तर त्याआधी आपणम स्वतः आदर्श राहायला हवं. म्हणून मुलांना जर आदर्श बनवायचं असेल तर आधी मायबापानं आदर्श वागणं व बनणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आदर्श असाल तर मुलं आपोआपच आदर्श बनत असतात.

           एक प्रसंग सांगतो. एका घरी एक पिता खर्रा खात होता. ते त्यांच्या पुत्रालाही माहीत होते. परंतू त्या वडीलांनी कधीच आपल्या मुलांसमोर खर्रा खाल्ला नाही. त्याचा परिणाम हा झाला की ती मुलं मोठी झाल्यावरही व्यसनाच्या आहारी गेली नाही. असे असावेत मायबापाचे संंस्कार. दुसरा एेक प्रसंग सांगतो. या प्रसंंगात एक आई आपल्या मुलीसमोरच ती मुलगी लहान असतांना तिच्या जन्मदात्या बापाला सोडून गेली. ती काही दिवस दुस-यापरपुरुषासोबत फिरली. त्यातच तिच्या पपतीला दाररुचं व्यसन लागलं व तो अति दारु सेवनानं मरणम पावला. ते सर्व चित्र तिच्या जन्म घेतलेल्या मुलीनं पाहिलं व तिही तरुण झाल्यानंतर आपल्या आईसमोर तशीच वागत होती. परंतू आता तिच्या आईला त्याचा त्रास होत होता. परंतू त्याचा आता काही उपयोग नव्हता. यासाठीच आपण कसेही असलो तरी चालेल, परंंतू निदान मुलांवर संस्कार करण्यासाठी तरी मुलांसमोर आपण आदर्श राहावं तसेच आदर्श वागावं. 

            आदर्श ममात्यापित्याची गोष्ट सांगत असतांंना एक स्री मी अशीही पाहिली की जी आपल्या स्व मुलीला परपुरुषांसोबत व्यवहार करायला लावते. कशासाठी तर पैशासाठी. आधी ती व्यवहार करीत होती आणि आता तिच्या मुलीची इच्छा नसतानाही तिची मुलगी. 

            कसे संस्कार होतील मुलांवर. खुद्द माता पिताच जर अशा प्रकारचे कृत्य करीत असतील तर….. खरंच आजच्या काळात संस्कारच दूर गेलेलेे आहेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. 

            ज्याप्रमाणे आईवडीलांनी मुलांंना आदर्श संस्कार देण्याचे धडे देण्यासाठी त्यांनी स्वतः आदर्श राहायला हवं. तसंच त्या मुलांनी आदर्श राहावं म्हणून त्याच्या शिक्षकांनीही आदर्श राहायला हवं. जर गुरु आदर्श असेल तर त्याचे विद्यार्थीही आदर्श बनू शकतात. परंतू आज चित्र वेगळं दिसतं. 

           पुर्वीचे शिक्षक हे आदर्श होते. त्यामुळंच सहजच त्याचे विद्यार्थी आदर्श असायचे. परंतू आजच्या काही काही शिक्षकातही आदर्शपण उरलेलं नाही. आजचा शिक्षक हा व्यसनाच्या आहारी गेलेला असून तोही व्याभिचार करतो. त्यामुळं तोच दर व्याभिचार करीत असेल तर त्याचे विद्यार्थी कसे काय आदर्श बनतील. तेही त्या शिक्षकांकडून अवगुणच घेवू शकतात यात शंका नाही. त्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला जर चांगली गोष्ट अभिप्रेत असेल तर त्या गुरुनं विद्यार्थ्यांससमोर चांगले संंस्कार ठेवावेत. त्यांनीही व्यसन अवश्य करावं. परंंतू ते विद्यार्थ्यांसमोर करु नयेत. जेणेकरुन विद्यार्थ्यात चांगले संस्कार फुलतील. ज्याचा त्यांनाच नाही तर समाजालाही फायदा होईल व समाजाव्यतिरीक्त देशालाही फायदा होईल यात शंका नाही. विद्यार्थ्यात जर चांगले संस्कार फुलले तर त्या विद्यार्थ्यांसह समाज पुढे जाईल व त्यानंतर देश. देशही विकासाच्या पातळीवरही वर जाईल असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here