नागपुरात चक्क बसस्टॉपच गेल चोरीला.
नागपुरात चक्क बसस्टॉपच गेल चोरीला.

नागपुरात चक्क बसस्टॉपच गेल चोरीला.

नागपुरात चक्क बसस्टॉपच गेल चोरीला.
नागपुरात चक्क बसस्टॉपच गेल चोरीला.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर :- नागपुर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात चक्क बसस्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप हे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. नागपूर महानगरपालिका प्रशासन झोपेत असून प्रवाशांचे हाल होत असल्याच्या भावना आता नागपूरकर व्यक्त करत आहेत. सध्या या बसस्टॉप चोरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत.

नागपुर शहरातील चोरीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण, आता नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रवाशांना उनवारा आणि पावसापासून बचावासाठी आधार असलेले नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप अक्षरशः गायब झालं आहे.

गेली अनेक वर्षे हे म्हाळगीनगर बसस्थानक इथे होते. प्रवासी याठिकाणी येऊन बसची वाट बघत बसायचे. मात्र, चोरट्यांनी अख्ख बसस्टॉपच उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सांगितले. मात्र, यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने काहीही कारवाई न केल्याने परिसरातील प्रवाशांना मात्र याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here