कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी मा.वैभव वाघमारे यांचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कडुन अभिनंदन.
मारोती काबंऴे
मीडिया वार्ता न्यूज
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो.नं.9405720593
गडचिरोली : -गडचीरोली जिल्ह्यातील अहेरी ,एटापल्ली व सिंरोचा हे महसुल उपविभाग अत्यंत अविकसीत,मागासलेले व सर्वच स्थरावर दुर्लक्षीत आहेत.
या कार्यक्षेत्रात कार्यरत सर्वच विभातील कर्मचारी हे शासकीय कामाकडे गांभिर्याने न बघता वेळ काढुपणा करतात त्यामुळेच या भागातील जनतेचे कामे वर्षोनुवर्षे तसेच पडुन राहतात. कर्मचारी मात्र मनमानी कारभार करतात.
हि बाब नवनियुक्त उप विभागीय अधिकारी महसुल
मा.वैभव वाघमारे यांनी बरोबर हेरली व जनतेचे कामे करन्यासाठी कर्मचार्यानां वेळेची व कामे करन्याची शिस्त नियमानुसार बंधनकारक केली.यासाठी त्यांनी स्वत:चे कार्यालयातच नियमित उशिरा येनार्या कर्मचारामुळे कार्यालयाला कुलुप लावुन ह्या कर्मचार्यावर शिस्त भंगाची कार्यवाही प्रस्तावित केली. ह्यामुळे सर्वच कर्मचारी वठणीवर आलेले आहेत.वेळेवर कार्यालयात उपस्थित होवुन कामे करतांना दिसत आहेत. मा.वाघमारे साहेब हे स्वत: जनतेचे कामे नियत वेळेत होण्याकडे लक्ष देत आहेत. ह्यामुळे जनतेचे हेलपाटा मारण्याचा त्रास बंद झालेला आहे.
ह्यामुळेच *शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अहेरी विधानसभा चे वतीने मा.वैभव वाघमारे* साहेबांचे अभिनंदन त्यांचे कार्यालयात जावुन करण्यात आले. यावेळेस *शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख विलास कोडापे,उप जिल्हाप्रमुख अरुण धुर्वे,विधानसभा संघटक बिरजु गेडाम,युवासेना जिल्हाधिकारी दिलीप सुरपाम,मा.उप जिल्हाप्रमुख स्वर्णसिंग डांगी,राजु मामीडवार,अनिल सराफ़ावार, युवासेना उप जिल्हाधिकारी राकेश मुन्नमवार,विलास सिडाम न.पं.सदस्य, श्रीमती चंदना बिष्णोई उप संघटीका महीला अक्षय गहेरवार,सोने सलामे* इत्यादी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळेस *मा.वैभव वाघमारे साहेब* उप विभागीय अधिकारी यांनी विकासाचे व जनतेचे कामासाठी मि सदैव उपलब्ध असेल अशी ग्वाही शिष्टमंडळाली दीली.