होळी सणाची शिकवण

 

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

होळीच्या तसेच रंगपंचमी च्या सर्वांना हार्दिक, हार्दिक शुभेच्छा होळी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे आणि सर्वाचा आवडता सण आहे. संपूर्ण भारत देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात होळीचा सण साजरा करताना कोणीही दिसून आले नाही. कोरोना नावाचा महाभयंकर संकट एकवेळचा निघून गेला आणि तो पुन्हा कधीच येऊ नये असे सर्वांना वाटत असते कारण त्याने सर्वाच्या जीवनातील रंग तर घेऊनच गेला पण हसत्या, खेळत्या कुटुंबाला कायमचा रडवत ठेवून निघून गेला ही महा भयकंर परिस्थिती आपण सर्वजण जवळून बघितले आहे. 

     होळी सणाची कथा सर्वांना चांगल्याप्रकारे माहीतच आहे कारण, प्रत्येक माणूस जरी सर्वगुणसंपन्न असला तरी एक दुर्गून माणसात असल्याने अख्खं जीवनच संपवून टाकतो होलीकेचं सुद्धा तसच झाले असत्याचा नाश झाला आणि शेवटी सत्याचा विजय झाला भक्त प्रल्हाद संपूर्ण विश्वात पुज्यनिय झाला ह्या, कथेतून सर्वजण शिकायला पाहिजे. 

 आपण ज्या गावात,शहरात किंवा मोहल्यात राहतो तिथे दरवर्षी होळी पेटवण्यासाठी मोठ्या आनंदाने एकत्र येत असतो , सोबत पुरणपोळीचा नैवध्य घेऊन मिळून, मिसळून मोठ्या आनंदाने होळीची पूजा, अर्चना करत असतो व होळी पेटविल्या नंतर एकमेकांना गुलाल,रंग लावुन होळीच्या शुभेच्छा देत असतो ही सर्वात असलेली एक प्रकारची आपुलकी,स्नेह ,जिव्हाळा आहे अशीच आपुलकी कायम राहण्यासाठी सदैव मिळून, मिसळून रहायला पाहिजे, मनात कोणाविषयी द्वेष, वाईट विचार, राग, भेदभाव,तिरस्कार असेल तर पेटत्या होळीत त्याच क्षणी जाळून टाकायला पाहिजे कारण, होळी सण आपल्याला त्याच प्रकारची शिकवण देत असतो. अशाच प्रकारचे वागणे किंवा आपुलकी, माणुसकी,स्नेह असणे गरजेचे आहे तरच माणूस, माणसापासून कोसोदूर जाण्याचा प्रश्नच येणार नाही. यासाठी होळीची शिकवण आत्मसात करून आचरणात आणणे तेवढेच आवश्यक आहे. तसेच होळी पेटवण्यासाठी हिरवेगार झाडे कधीही तोडू नये, नको ते पाप करू नये त्यापेक्षा आपल्या परीसरात साचलेला कचरा असेल तर…एकत्रीत करून त्याची होळी पेटवावी, आपलाच परीसर स्वच्छ व सुंदर दिसेल.. .जेणेकरून बिमाऱ्या कमी होतील. हे सर्व घडवून आणणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. 

        त्याच प्रमाणे होळी सणाचा दुसरा दिवस म्हणजेच रंगपंचमी या दिवसाची तर वर्षभरापासून सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात खास करून रंगपंचमी हा दिवस लहान मुलांना जास्तच आवडत असतो तेवढाच मोठ्या माणसाना सुद्धा आवडत असतो म्हणून सर्वजण आनंदीत असतात, एकमेकांना रंग लावुन शुभेच्छा सुद्धा देतात, पण काही वर्षाच्या आधी गावखेड्यात राहणाऱ्या लहान मुलांचे जरा वेगळेच होते आणि काही ठिकाणी आजही आहे लहान मुले रंग बणविण्यासाठी पळसाची फुले जमा करून एका मातीच्या भांड्यात भिजवून ठेवत असत बांबूपासून तयार केलेली केलेली पिचकारी किंवा दुकानात मिळणारी तीन रुपयाची पिचकारी घेऊन त्याच पिचकारीने अख्खं दिवसभर रंग खेळत असत हे काही वर्षापूर्वी गेलेले दिवस व आठवणी आहेत, कारण ते रम्य बालपण होते, आनंददायी उत्साही जीवन होते सोबतच गावातील काही विनोदी लोक बाईची वेषभूषा,किंवा इतर वेषभूषा करून वाजत, गाजत सिमग्याचा भोजारा द्या म्हणुन घरोघरी व गावभर फिरत असत ते क्षण हसते, खेळते रंगपंचमीचे दिवस होते.  

       गावखेड्यात बघायला मिळायचे पण, ते सुद्धा हळूहळू कमी दिसायला मिळत आहे . रंगपंचमी च्या दिवसाची आपण जशी आतुरतेने सर्वजण वाट बघत असतो तसच प्रत्येकांच्या जीवनामध्ये रंग भरायला विसरू नका, आपुलकी, स्नेह, प्रेम द्यायला विसरू नका, होळी कडून जेवढी आपल्याला शिकवण मिळते तेवढीच शिकवण सुद्धा रंगपंचमी देत असते आपल्या कडून कोणतेही वाईट घडणार नाही किंवा कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. होळीचा सण सर्वानी आनंदाने साजरा करावा जेणेकरून निसर्गाला सुद्धा आनंद झाला पाहिजे, सोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करावे प्रेम, द्यावे, प्रेम घ्यावे होळीची आणि रंगपंचमीची शिकवण सदैव आपल्या आठवणीत ठेवावे. दरवर्षी येणाऱ्या या सणाचे भरभरून स्वागत करावे पण, गोर, गरीबांच्या जीवनात रंग भरायला किंवा त्यांची मदत करायला विसरू नये रंगपंचमीच्या दिवशी पाच तरी मिनिटे त्यांच्यासोबत घालवावे नक्कीच कुठेतरी आपल्याला वेगळेपणा जाणवेल व होळी सणाकडून आपल्याला काही तरी शिकल्यासारखे वाटेल..फक्त माणुसकीच्या नात्याने तरी आपल्याला एवढे तरी करता आले पाहिजे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here