क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांसाठी आमदार सुभाष धोटे देणार आमदार विकास निधीचे १ कोटी रुपये.
क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांसाठी आमदार सुभाष धोटे देणार आमदार विकास निधीचे १ कोटी रुपये.

क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांसाठी आमदार सुभाष धोटे देणार आमदार विकास निधीचे १ कोटी रुपये.

जिवती येथे रुग्णवाहिकेसाठी १५ लक्ष आणि राजुरा, कोरपना, गडचांदूर, जिवती व गोंडपिपरी येथे ८५ लक्ष.

क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांसाठी आमदार सुभाष धोटे देणार आमदार विकास निधीचे १ कोटी रुपये.
क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांसाठी आमदार सुभाष धोटे देणार आमदार विकास निधीचे १ कोटी रुपये.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार विकास निधीतून १ कोटी रुपये क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील वाढत्या कोरोना परिस्थितीकडे जातीने लक्ष वेधले असून येथे सर्व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध होण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळेच येथे अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध होत असून येणाऱ्या काळात या कामास आनखी गती मिळून कोरोना रुग्णांवर स्थानिक पातळीवरच सर्व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ते आग्रही आहेत.

आमदार विकास निधी अंतर्गत जीवती येथे रुग्णवाहिकेसाठी १५ लक्ष रूपये, उपजिल्हा रुग्णालय राजुरा, गडचांदूर, कोरपना, गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालय आणि जिवती, पाटण, मांडवा, गाडेगाव विरूर, नारंडा, देवाडा, चिंचोली, कढोली, तोहोगांव, धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यंत्रसामग्री, उपकरणे व औषधे खरेदीसाठी ८५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात सध्या कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अनेक ठिकाणी आवश्यक सुविधांअभावी रुग्णांना मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. ही परिस्थीती पाहून आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे आपल्या आमदार विकास निधीतून ग्रामीण रुग्णसेवेवर निधी खर्च व्हावा आणि येथे कोरोना विषयक सर्व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी १ कोटी रुपये निधी आमदार स्थानिक विकास निधी मधून खर्च करण्याबाबत चा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे या निधीतून राजुरा विधानसभा क्षेत्रातील वरील सर्व भागात आरोग्यसेवेला बळ प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here