Home latest News मुंबईत प्रेमात नणंद-भावजयनं केली एका तरुणाची हत्या.

मुंबईत प्रेमात नणंद-भावजयनं केली एका तरुणाची हत्या.

73

मुंबईत प्रेमात नणंद-भावजयनं केली एका तरुणाची हत्या.

मुंबईत प्रेमात नणंद-भावजयनं केली एका तरुणाची हत्या.
मुंबईत प्रेमात नणंद-भावजयनं केली एका तरुणाची हत्या.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपण प्रेमसंबधातून होणाऱ्या हत्याचे अनेक खळबळजनक घटना समोर येतात. मात्र एक चक्क युवकाला प्रेमासाठी भांडण महागात पडलं आहे. त्याच्या जीवावर बेतलं आहे. ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. तरुणाने शिवीगाळ केल्याच्या रागातून 2 महिलांनी तरुणाची दुर्दैवी हत्या केली. हा खळबळजनक घटना मुंबईच्या आर सी एफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

तरुणाची हत्या प्रकरणात दोन महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपीच्या कुटुंबातील एक तरुणीशी सुनील जांभूळकर या तरुणाचे पूर्वी प्रेमसंबध होते. हेच कारण त्यांचं भांडण विकोपाला जाण्याचं ठरलं. त्यांच्यातील वाद वाढला आणि तरुणानं दोघींना शिवीगाळ सुरू केला. सुनील चेंबूरच्या सहयाद्री नगर येथे आरोपींच्या घराजवळ आला असता त्यांची पुन्हा भांडणे झाली.

या वेळी सुनीलने या महिलांना अश्लील शिव्या दिल्या. त्यावरून या दोन्ही महिलांनी त्याला एका घरात ओढत नेऊन त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर ओढणीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली.

या हत्ये प्रकरणात करुणा ऊर्फ संतोषी माने आणि उषा माने या दोघींना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार या नणंद आणि भावजय आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास आर सी एफ पोलीस ठाणे करत आहेत.