ग्रामीण भागात आजही जपली जाते '॥लग्न मांडवधरी॥' संस्कृती.

ग्रामीण भागात आजही जपली जाते ‘॥लग्न मांडवधरी॥’ संस्कृती.

ग्रामीण भागात आजही जपली जाते '॥लग्न मांडवधरी॥' संस्कृती.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड- ग्रामीण भागात रबी व खरीप हंगामाची शेतातील कामे उरकली की कडक उन्हाळ्यात लग्न सराई सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.. जग झपाट्याने बदलत जात असले तरी ग्रामीण भागात आजही काही रूढी परंपरा उत्तमरीत्या जोपासल्या जातात… त्यातीलच एक संस्कृती म्हणजे ‘मांडवधरी’.. वेगवेगळ्या भागात ही संस्कृती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते..
ग्रामीण भागात घरे ही लहान असतात आणि त्यात लग्न असले की पाहुण्यांची रेलचेल जास्त असते अश्या वेळी बरीच कामे ही बाहेरच करावी लागतात यातूनच या संस्कृती चा उदय झाला असावा…
लग्नाच्या आदला दिवस म्हणजे मांडवाचा दिवस..ग्रामीण भागात घरातील प्रमुख गावामध्ये उद्या मांडव टाकायचा आहे यासाठी गावातील लोकांना निमंत्रण देतो… भल्या सकाळीच गावातील माणसे गोळा होतात आणि बैल बंडी घेऊन जंगलात जातात आणि जंगलातून नऊ डेरी व फाटे तोडून आणतात यात महत्वाची डेर असते ती *मोवई*या झाडाची.. तिला सर्वात महत्वाचे स्थान असते.. याच बरोबर कडक ऊन असल्याने मांडवात थंडावा राहावा यासाठी मांडवावर टाकण्यासाठी उंबर,कडुनिंब, जांभूळ,करंजी यासारख्या झाडांच्या पानांच्या फांद्या आणल्या जातात… व घरी आल्यावर सर्व गावातील लोक मिळून मांडव टाकतात.. आणि मांडव तयार झाल्यावर या सर्व लोकांना मांडव जेवण म्हणून उडदाच्या वळ्याची भाजी किंवा बेसन जेवणात वाढले जाते…
या सुंदर मांडवाचे वर्णन लोकगीतातून केल्या जाते..
हिरव्या बाई मांडवात शेणाचा सडा..
शेणाच्या सड्यावर मोत्याच्या चौथरा…
अन मोत्याच्या चौथऱ्यावरी चौरंग पाठ ठेवा..
अन चौरंग पाठावरी उभी रायजो
न आपल्या मामाजीची वाट पायजो….

मांडव टाकल्यानंतर या मांडवाची व नऊ डेरीची पूजा केल्यानंतर लग्नाचे सर्व दंडोक या मांडवात साजरे केले जातात.. सुवासिनी पाच बाया या शेतातून माती आणतात व त्यानंतर त्यापासून बोहला तयार करतात… या हिरव्यागार मांडवात हे सर्व कार्यक्रम होत असताना विविध लोकगीते आजही ग्रामीण भागात गायले जातात यामुळे आनंदाची भरच पडत असते… मांडव सुतावणे या यातीलच एक दंडोक असतो सर्व जावई लोक जोडीने हे मांडव सुतावत असतात… यावेळी,गमंत म्हणून
नऊ डेरीचे नऊ वडे
मांडव सुतावता जोडे मारे
अश्या प्रकारचे लोक गीत गायले जाते….. तर नवरदेवाला हळद लागत असताना म्हणजेच नवरदेव होत असताना…
वल्या वल्या मांडवात वाजा काहाचा वाजते…
केवळ बापू नवरदेव होते माली बोलावले जाते
असे सुंदर लोकगीत गायले जाते….
याच मांडवात या लग्न विधी मध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारा व मानाचे स्थान असलेला न्हावी जेव्हा नव्या नवरदेवाला तयार करतो तेव्हा अस्सल ग्रामीण भाषेत…
भाली दादा काय करते
भाली दादा काय करते…
नवरदेव बापुची दाढी करते
नवरदेव बापुची दाढी करते…. अश्या प्रकारचे लोकगीत गायले जाते… वधूच्या आईची टर उडविणारे गाणे सुद्धा गायले जाते…
आली वरात धसली घरात
आली वरात धसली घरात…
नवरीच्या मायेले कायचा तरास
नवरीच्या मायेले कायचा तरास….
आजी लोक नवरदेव नातवाची मजा घेताना…
लहान वटाना,मोठा वटाना
नवरदेवाच्या मांडवात हल्या उताना…
लहान बेहळा, मोठा बेहळा…
नवरदेव बापू आहे मोठा लेहळा…
अशी गमती दार गाणी सुद्धा या मांडवात गातात… मांडवधरी ची ही संस्कृती सामाजिक ऐक्य निर्माण करणारी आहे.. कारण या प्रसंगी गावातील सर्वच जाती धर्माचे लोक एकत्रित येत आपुलकीच्या नात्याने या कार्यात सहभागी होत असतात…!!
जग झपाट्याने बदलत जात आहे हल्ली मोठं मोठ्या हाँल मध्ये लग्न लावले जात असल्याने व लग्नासाठी आता कोणतेही हंगाम नसल्याने बाराही महिने लग्न सराई सुरू असल्याने या रूढी परंपरा शहरी भागात जोपासल्या जात नसल्या तरी ग्रामीण भागात मात्र आजही ही संस्कृती जोपासली जात आहे…!!!

सुंदर लेख बनविले

– पराग केवळराम भानारकर
साह्यायक शिक्षक ,तसेचनागभीड.तालुका पञकार संघ सदस्य, मो,8275294552

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here