देशभरात ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणाऱ्या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्वज्ञान यांच्या इतकेच महत्व दिले आहे. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे. पण हा दिवस आजच्या तारखेलाच का साजरा करतात?

श्री कृष्णकुमार निकोडे
जि. गडचिरोली,
मो. नं: ७४१४९८३३३९

आजच्या दिवशी- दि.११ मे १९९८ रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे.अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाची कामगिरी केली. ती कामगिरी राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रातील होती. त्यात शक्ती-१ या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली गेली. या प्रगतीचे प्रतीक ११ मे हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याशिवाय याच काळात देशातच विकसित झालेल्या पहिल्या स्वदेशी विमान हंस-१ने पहिले उड्डाण बेंगळुरू येथे घेतले. हे विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे विमान नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने विकसित केले होते. तसेच कमी पल्ल्याचे, जलद- प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे- एसएएम क्षेपणास्त्र- त्रिशूल हा भारतातील गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता. देशाच्या या प्रचंड यशानंतर भारताचे तत्कालीन माजी पंत्रप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला.

भारतात सन १९९९पासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.
दि.११ मे १९९८ रोजी भारतात यशस्वी अणुचाचणी घेण्यात आली होती. त्यानंतरच अण्वस्त्रे असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले. भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. त्यानंतर १३ मे रोजी दोन विभक्त चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे नेतृत्व माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे. अब्दुल कलाम यांनी केले. त्यानंतर दि.११ मे १९९९ रोजी प्रथमच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. या दिवसाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.

या दिवसापासून आजपर्यंत तंत्रज्ञान विकास मंडळाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल शास्त्रज्ञ व अभियंत्यांना सन्मान व प्रोत्साहन दिले आहे. वैज्ञानिक, डीआरडीओ- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भाभा अणुसंशोधन केंद्र- बीएआरसी आणि एएमडीईआर- अणू खनिज संचालनालय अन्वेषण आणि संशोधन यांनी यशस्वीरीत्या चाचणी केली. हेच कारण होते ज्यामुळे भारत थर्मोन्यूक्लियर शस्त्रे तयार करण्यास सक्षम बनू शकला.

आज नॅशनल टेक्नोलॉजी डे- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून भारतासाठी आजचा दिवस खास आहे. हा दिवस भारतासाठी अनेक कारणांमुळे विशेष आहे. वरीलप्रमाणे एक अतिशय रंजक इतिहास यामागे दडलेला आहे. दरवर्षी ११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस म्हणावा लागेल. दरवर्षी याच दिवशी उत्साहात साजरा केला जातो. तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या दिवशी हंस-१ या पहिल्या भारतीय विमानाने यशस्वी भरारी घेतली होती. त्याशिवाय डीआरडीओने याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीही केली. हे एक क्षेपणास्त्र आहे जे त्याच्या लक्ष्यावर वेगाने हल्ला करते.

हा इतिहास कायम स्मरणात रहावा आणि भारतीय युवापीढी या दिवसाची सदोदित प्रेरणा घेत रहावी. म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, हे विशेष येथे उल्लेखनीय!
!! भारतीय तंत्रज्ञान दिनानिमीत्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here