नागपूर वरुन मुंबई पोहचणार आता रेल्वेने सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- नागपुर ते मुंबई हे अंतर पुर्ण करण्यासाठी रेल्वेला सध्या 12 तास लागतात. मुंबई – नागपूर अंतर सहा तासांत पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची योजन आखली जात आहे. त्यासाठीचे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड या रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून प्रमुख शहरांदरम्यान सेमी हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची योजना आखली जात आहे. प्राथमिक टप्प्यावर असलेल्या योजनेची व्यवहार्यता तपसाली जात आहे.

मुंबई ते नागपूर प्रवासासाठी सध्या 12 तास लागतात. हाय स्पीड कॉरिडॉरमुळे हा वेळ सहा तासांपर्यंत कमी होईल. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. नागपूर-मुंबई दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामागार्ला लागूनच हा बुलेट ट्रेनचा मार्ग होणार आहे. 736 किमीच्या या मागार्साठीचे सर्वेक्षण 12 मार्च रोजी मुंबईतून सुरू झाले आहे.

सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू असून विशेष विमानात अत्याधुनिक यंत्रणा बसवून त्याद्वारे हे काम सुरू आहे. या आधुनिक पद्धतीत विमानातून प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या दीडशे मीटर परिसरातील चित्रीकरण केले जाणार आहे. यासाठी 100 मेगापिक्सलचा कॅमेरा विमानाला लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here