वाशीम जिल्हा हवामान विभागाने दिला होता जोरदार पाऊसाचा अंदाज
विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशीम/ शेलुबाजार:- राज्यात आणी जिल्हाला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी चार दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.
वाशीम जिल्हात शनिवारी दुपारपर्यंत आकाश स्वच्छ होते. दुपारनंतर ढग जमून गडगडाट होऊन त्यापाठोपाठ मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. वाशीम जिल्हात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन कापणीला वेग आला होता. कापूस पीक पण शेतात उभ असल्याने शेतकरी आज चिंताग्रस्त झाला आहे. परतीच्या पाऊसा मुळे शेतक-यांचे खुप मोठे नुसकान होण्याची शक्यता आहे.