महाराष्ट्र बंद : पाचोर्यात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद.
महाराष्ट्र बंद : पाचोर्यात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद.

महाराष्ट्र बंद : पाचोर्यात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद.

महाराष्ट्र बंद : पाचोर्यात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद.
महाराष्ट्र बंद : पाचोर्यात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद.

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

पाचोरा/जळगाव:- केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडणार्या प्रकाराचा निषेध करीत झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग यावी म्हणून महाविकास आघाडी ने बंद च्या घोषणेत पाचोरा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

शेतकरी विरोधी तिन काळे कायदे रद्द करा यामागणीसाठी मागिल तिनशे दिवसा पासुन दिल्ली च्या सिमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पंतप्रधान मोदींनी ठेंगा दाखविला आहे त्यातच रहीमपुरखेरी या गावातील शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असतांना त्यांना केंद्रीय मंत्रीच्या मुलाने स्वतः च्या गाडी खाली चिरडले यात एक पत्रकार देखिल शहीद झाला आहे. शहीद शेतकर्‍यांच्या परीवाराला सांत्वन भेट द्यायला जातांना कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज दि. ११ ऑक्टोंबर रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असता पाचोरा शहरातील व्यापारी वर्गाने बंद मध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ. दिलीप वाघ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, गटनेते संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अझर खान, कॉग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रा. एस. डी. पाटील, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अॅड वसीम बागवान,नाना पाटील, भुषण पाटील, शरीफ खाटीक, गणेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे बशिर बागवान, नितीन तावडे, रणजित पाटील, सत्तार पिंजारी, गौरव वाघ, उमेश एरंडे, हेंमत पाटील, अॅड. अविनाश सुतार, गोपी पाटील, सलिम शाह, खलील देशमुख, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भोला चौधरी, संजय पाटील, विनोद पाटील, हरुन देशमुख, भगवान मिस्तरी, अरुण पाटील, प्रकाश भोसले, शिवसेनेचे शिवसेना गणेश पाटील, पप्पू राजपुत, प्रवीण ब्राम्हणे, अनिल सांवत, आंनद पगारे, आदी उपस्थित होते. बंद दरम्यान आ. किशोर पाटील, डीवायएसपी काकडे, पो. निरीक्षक नजनपाटील, पी.एस.आय विकास पाटील यांनी भेट दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here