माणगांव पोलिसांनी फिल्मी स्टाईलने रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपीचा केला पर्दाफाश 

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-माणगांव पोलिसांनी पुष्पा स्टाईलने कारवाई करत माणगांव तालुक्यातील इंदापूर विभागातून सुमारे ४० किलो रक्त चंदन सदृश पकडले आहे. लाकडाची तस्करी होणार असल्याची खबर माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना गोपनीय स्त्रुताकडून लागली असल्याने त्याच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश आस्वार, पो. उपनिरीक्षक के. ये. गायकवाड, पो. उपनिरीक्षक अस्मिता पाटील याच्या मार्गदर्शनखाली माणगांव पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर, पो. हवालदार दर्शन दोंडकुलकर, पो. शि. श्यामसुंदर शिंदे, पो. शि. रामनाथ डोईफोडे, गोविंद तलवारे, अमोल पोधे , दिपाली मोरे माणगांव वनविभाग वनशेत्रपाल अनिरुद्ध ढगे व त्याची टीम यांनी कारवाई केली.

यामध्ये तीन आरोपी सुनील प्रेमचंदपटवा रा. सात रस्ता भायखळा मुबंई, शरीफ खान, वय वर्ष 25 रा. उत्तर प्रदेश, इम्रान शेख सात रस्ता मुबंई, हे तिघे निजामपूर वरून सुमारे ४० किलो रक्तचंदनसदृश लाकडाचा साठा घेऊन वैगणार कार क्रमांक. एम एच 03 बी सी 3598 ही कार घेऊन मुबंई येथून आले होते त्याची खबर माणगांव पोलिसांना समजतात माणगांव पोलिसांनी सापळा रचून निजामपूर रोड येथील हॉटेल गारवा जवळ पकडण्याचा पर्यन्त केला मात्र तस्करी करणाऱ्या आरोपी ने तेथून पळ काढला मात्र माणगांव पोलिसांनी पुष्पा स्टाईलने पाठलाग करून इंदापूर येथे पकडले.व आरोपीकडून मुद्देमाल जप्त केल्यानंतर पुढील तपास माणगांव पोलीस व माणगांव वनविभाग याच्याकडून संयुक्तीकरित्या तपास अंती आरोपीवर भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनविभाग अधिकारी अनिरुद्ध ढगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here