मृत्यूनं आपला पवित्रा बदलला आहे?

अंकुश शिंगाडे 

नागपूर, मो:९३७३३७९४५०

मृत्यू…मृत्यूला वाट असते. वाट म्हणजे प्रतिक्षा आणि वाट म्हणजे रस्ता. होय, मृत्यू वाटच पाहात असतो. कोणाजवळ जायचे. मृत्यू ठरलेला असतो. असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरु नये. कारण ज्यावेळेस सृष्टीतील कोणताही जीव जन्म घेतो. त्यावेळेस त्या त्या जीवजंतूच्या प्रारब्धानुसार त्याचा मृत्यू हा ठरलेलाच असतो. त्यामुळं ज्याचा जन्म झाला, तो कधी ना कधी मरणारच. अर्थात जिथं उत्पत्ती असते, तिथं विनाशही असतो.

आपल्या घरी जे वर्तमानपत्र येतं. त्या वर्तमानपत्रात दररोज बातम्या छापून येतात. अमूक व्यक्ती अमूक अमूक कारणानं मरण पावला. त्यात कोणी आत्महत्या केली. कोणी अपघातात मरण पावला तर कोणाचा खून झाला. मरणाबाबत एकशे एक कारण. साप दंश, विंचू दंश, वीज पडणे, करंट लागणे, ठेच लागणे, आजारपण, वृद्धपण. अशी कितीतरी कारणं. त्यामुळंच आपण म्हणतो की व्यक्ती अमूक अमूक कारणानं मरण पावला. कारण मृत्यू स्वतः कधीच आपल्यावर दोष येवू देत नाही. तसं पाहता या मृत्यूला जबाबदार काही नैसर्गिक घटकही आढळून येतात. जसे- पूर येणे, भुकंप येणे, त्सुनामी येणे, दरड पडणे, रेल्वे अपघात होणे, बस अपघात होणे, बॉम्बस्फोट होणे, एखाद्या विशिष्ट रोगाची साथ येणे. काल जशी कोरोनाची साथ आली तशी आणि कालपरवाला ओडीसात रेल्वे अपघात झाला तसा. यात मृत्यूची संख्या ठरलेली राहात नाही. मात्र या गोष्टी जसा जन्म तसा मृत्यू हाच संदर्भ दर्शवितात.

https://mediavartanews.com/2023/06/07/international-ocean-day-information/

मानव सामाजिक प्राणी आहे. तो समाजात वावरतो. त्यामुळं कोणी मरण पावल्या व तो जवळच्या नातेसंबंधातील असल्यास काळजी वाटते व आपण तेथे जावून शोक व्यक्त करतो. काही जण रडतात. काही तर एवढे गंभीर होतात की बिचारे अगदी अटॅक येवून मरण पावतात. कारण त्यांच्या प्रारब्धानुसार तसंच मरण लिहिलेलं असतं.

मरण…मरणाचे दुःख कोणाला होत नाही. सर्वांनाच होतं. साधी मुंगीही मेलेल्या जिवास पाठीवर ओढत नेवून जमीनीत गाडते. काही कुत्रीही आपल्या मृत पिल्लाला नेवून जमीनीत पुरते आणि माकडही. काही प्राण्यांना असा मृतदेह जमीनीत पुरता येत नाही, ते त्या मृतदेहाभोवती गोळा होतात. काहीतरी विचीत्र आवाज काढतात व नंतर आपल्या आपल्या दिशेला रवाना होतात. हीच शोकसंवेदना असते प्राण्यांची.

 मृत्यू हा अटळ आहे. कोणाला लवकर येतो आणि कोणाला लवकर. काही मृत्यू बाळ जन्मतःच येत असतात. तर काहींना मृत्यू कितीही संकट आलं तरी येत नाहीत. जसे काही काही मुलं अनैतिक संबंधातून जन्मतःच त्यांची आई ही त्या बाळाला कच-यातही मरणासाठी सोडून देते. बिचारं इवलंसं बाळ रात्रभर तडफडत असतं. परंतू मरत नाही. ते सकाळी कचरा उचलणा-या व्यक्तींना दिसतं आणि त्यानंतर त्याला जगविण्याचे प्रयत्न सुरु होतात. अशा मुलांचे अवयव रात्रभर कुत्री कुरतडत असतात. तरीही ते वाचतात. कारण त्यांच्या प्रारब्धानुसार त्यावेळेस मृत्यू हा लिहिलेलाच नसतो.

मृत्यू अटळ आहे. तो कधी ना कधी येतोच. परंतू काही लोकं तो येवू नये. म्हणून किती काळजी घेत असतात. हे सांगायलाच नको. ते शरीराची एवढी काळजी घेतात की त्यांना कधीच अस्वच्छपणा आवडत नाही. साध्या कागदाला जरी हात लावला, तरी आपल्याला आजार होईल, या भीतीनं ते हात धुत असतात. जेवनही करतांना अति दक्ष राहून जेवन करतात. त्यांच्या खानपानाच्या सवयी वेगळ्याच असतात. जेवन करतांना त्यांना पाणी शुद्ध हवं. झोपतांना अंथरुण स्वच्छ हवं. श्वास घेतांना हवा शुद्ध हवी. एवढा शुद्धपणा. खरंच त्यांना कधी मृत्यू येणारच नाही असं वाटत असतं. मग त्यांना मृत्यू येत नाही का? येतं. त्यांनाही मृत्यू येतं. तीच मंडळी सर्वात जास्त आजारी पडतात आणि त्याच मंडळींना जास्त वेळा अपघात होतो.

महत्वाची मृत्यूबाबत गोष्ट सांगायची झाल्यास मृत्यूला कोणत्याही धर्मानं रोखलेलं नाही. हिंदू धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, मुस्लिम वा बौद्ध धर्म असो वा जैन. प्रत्येक धर्मात मृत्यू हा ठरलेला आहे. फरक एवढाच आहे की त्या मृत्यूचा कालावधी हा वेगवेगळा आहे. हं, जन्माला काही वेळ थांबवू शकतो अलीकडील तंत्रज्ञानानुसार. कोणी तर असे महाभाग आहेत की त्या गर्भाची वाढ होवो वा न होवो, त्यांना त्यांच्या विवाहाच्याच वर्धापनदिनी बाळ हवं असतं. तसं ते सिझर करुन त्या विवाहाच्या वाढदिवशीच बाळ जन्माला घालू शकतात. परंतू मृत्यूबाबत तसं नाही. मृत्यू येवू नये म्हणून लोकं सारं काही करतात. जसे विशेष काळजी घेत असतात. विशेष काळजी म्हणजे महामृत्यूंजय मंत्राचा जाप करीत असतात. यज्ञकुंड तयार करुन महामृत्यूंजय यज्ञ करीत असतात. होम हवन करीत असतात. परंतू ते सारं थोतांड आहे. कारण तसं केल्यावरही तो जीव वाचतो का? तर याचं उत्तर नाही असंच येतं.

कोणी म्हणतात की अलीकडील काळात मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहेत. निरनिराळ्या औषधांचा शोध लागल्यानं वेळीच औषधोपचार करुन मृत्यूला टाळलं जातं. होय, बरोबर. शंभर प्रतिशत सत्य. परंतू खरंच टाळला जातो का मृत्यू? याचं उत्तरही नाही असंच येतो. जेव्हा दिवस भरतात ना. तेव्हा कोणी कितीही औषधोपचार करो. मृत्यूला टाळूच शकत नाही आपण. मृत्यूबाबत आणखी एक मत मांडतो की पुर्वीच्या काळात अनेक युद्ध होत. त्यात अनेकजण मरत. तरीही काही काही माणसं अगदी शंभरच्या वर जात. त्यावेळेस आज जेवढ्या जास्त प्रमाणात औषधोपचार उपलब्ध आहे. तेवढ्या जास्त प्रमाणात त्यावेळेस औषधोपचार उपलब्ध नव्हता तरीही. याला काय म्हणावे? याचाच अर्थ असा की तुम्ही कितीही काळजी घ्या. कितीही स्वतःला संदूकमध्ये कटिबद्ध करुन ठेवा. 

तुम्ही अगदी काचेच्या महालात बंदिस्त करुन राहिले, तरी मृत्यू हा येणारच. तो टाळल्या जात नाही वा टाळता येत नाही. त्यामुळंच नाही जीवनात कोणती काळजी घेतली तरी चालेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. एका राजाला एका साधूनं शाप दिला की तू सातव्या दिवशी अमूक अमूक वेळेस सर्पदंशानं मरशील. आता साधूचीच ती भविष्यवाणी. राजाला ती खरी वाटली व त्यानं स्वतःला अशा काचेच्या महालात गुंफून घेतलं की जिथं साधी मुंगीही प्रवेश करु शकणार नाही. परंतू त्या साधूच्या शापवाणीनुसार मृत्यू अटळ होता. तशी त्याचवेळेस राजाची बोरं खायची इच्छा झाली.राजाज्ञाच ती. ती कशी टाळता येईल. शेवटी बोरं आणली गेली. राजा एक एक बोर चाखू लागला. त्यातच त्या वेळेस एका बोरामधून एक सापासारखीच दिसणारी अळी बाहेर पडली व तिनं राजाला दंश केला. ज्यात राजा मरण पावला. जणू अळीच्या रुपात येवून साधूच्या शापवाणीनुसार राजा सातव्याच दिवशी त्याच वेळेस मरण पावला.

मृत्यू अटळ आहे. त्याची वेळ व काळ ठरलेली असते. तो कधीच पहिलं येत नाही व नंतरही येत नाही. आपण कितीही काळजी घेतली तरी. तो येतोच प्रत्येकांच्या जीवनात. याचा प्रत्यय आलाच आपल्याला कोरोना काळात. कोरोनात जे सॉनीटायझर वापरायचे सतत. जे स्वतःची काळजी घ्यायचे अविरत. त्यांना कोरोना झाला व त्यातील काही काही मरणही पावले अन् जे त्या काळात काळजी घेत नव्हते पुरेशी. ना हात धुत होते. ना गरीबीमुळं सॉनीटायझर वापरत होते, ते जीवंत राहिले. ही उदाहरणं आहेत आपल्याचसमोर. तरीही आपली आजची मृत्यूबाबत विचारशक्ती बदललेली नाही. कोरोनानं जगणं शिकवलं आपल्याला. बरीचशी मंडळी अशी होती त्या काळात की जी न घाबरता व स्वच्छतेचं पुरेसं पालन न करता आपली सेवा करीत होती आणि आपल्याला जगवीत होती. ते चालत होतं आपल्याला आणि आज जसा काळ बदलला, तसे आपणही बदललो, आपल्या भावनाही बदलल्या. त्याबरोबर सारंच बदललं. तसेच आपले विचार बदलले. जसे विचार बदलले. तसा भेदभाव आला स्वच्छ आणि अस्वच्छतेचा. आता तीच माणसं आज आपल्याला अस्वच्छ वाटू लागली आहेत. कारण कोरोना गेलेला आहे. 

परंतू लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की कोरोना गेलेला असला तरी मृत्यू टळलेला नाही. तो कधीच भेदभाव करीत नाही की हा स्वच्छ व हा अस्वच्छ. तो दोघांवरही तेवढ्याच ताकदीनं वार करतो. मग विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून सावधान असावं मृत्यूबाबत. कारण मृत्यू हा कधी ना कधी येणारच. तेव्हा आपण स्वच्छ अस्वच्छतेचा भेदभाव करु नये. याउलट असे म्हणता येईल की हीच अस्वच्छता आपल्यामधील प्रतिकार शक्ती वाढवीत असते. मृत्यूशी दोन हात करण्यासाठी महत्वपुर्ण गोष्ट अशी की मी अस्वच्छ राहा असं म्हणत नाही. परंतू आज जी मंडळी स्वच्छ अस्वच्छतेबाबत भेदभाव करतात ना. म्हणून त्यांना माझं सांगणं आहे की त्यांनी असा कोणताच भेदभाव कुणाबद्दल बोलू नये. जेणेकरुन त्यांना राग येईल व तसा मृत्यूलाही राग येईल व मृत्यू असाच ओडीसासारखा थैमान माजवेल व मरण कोणाला टाळता येणार नाही. 

कारण आज तुमच्यासारखाच मृत्यूही समजदार झाला आहे. त्यानंही आपली दिशा बदलवली आहे. तो विचार करतोय की माणसं आजारपणात रुग्णालयात जातात ना. मग त्यांना रुग्णालयात जाण्यापुर्वीच मारायचं. ऑन दी स्पॉट……त्सुनामी, भुस्खलन, भुकंप, बॉंम्बस्फोट, अपघात आणि आत्महत्या, या माध्यमातून. हे तेवढंच खरं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here