त्रास त्यालाच सहन करावा लागतो ….!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

     माणसाचं जीवन म्हटलं तर सुखा, दु:खाचं संगम आहे त्यासोबतच अशा बऱ्याच गोष्टींची नाळ सुध्दा जुळून असते सोबत चांगली, वाईट परिस्थिति,आपत्ती ह्या तर कायमच असतात ते शेवटच्या क्षणापर्यंत जुळून राहतात म्हणून हार मानून जीवन जगणे सोडून द्यायचे का…? काहीही झाले तरी आधी जीवन जगणे आवश्यक आहे या समाजात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला कोणत्या, ना कोणत्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो हे खरे आहे पण,सर्वात जास्त त्रास त्यालाच सहन करावा लागतो जो नेहमीच सत्य स्वीकारून जगत असतो त्याच्या जीवनात पदोपदी क्षणाक्षणाला संकटांची रांग लागलेली असते त्यामुळे त्याला जास्त त्रास सहन करावा लागतो. सर्वात पहिला त्रास म्हणजेच तो सत्य बोलत असतो आणि त्याचे हेच सत्य बोलणे व वागणे इतरांच्या डोळ्यात काट्यासारखे टोचत असतात त्यामुळेच त्या माणसाला त्रास देण्यासाठी, हरविण्यासाठी,फसविण्यासाठी असे नाना तऱ्हेचे कटकारस्थान रचण्यासाठी संधी सोडत नाही हा त्रास म्हणजेच एक प्रकारचा मानसिक त्रास असू शकते.कधी,कधी काय होतं की,हा मानसिक त्रास जीवघेणा सुध्दा होऊ शकते अनेकदा या विषयावर कुठे ऐकले असणार. दुसरा त्रास म्हणजेच स्वत:च्या विषयी विचार न करता समाजाच्या हितासाठी किंवा एखाद्या रंजल्या, गांजलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जेव्हा तो माणूस झटत असतो त्यावेळी त्याच्याच लोकांपासून त्रास व्हायला सुरूवात होते. 

       अशा लोकांमुळेच तो माणूस फार दु:खी असते त्याला इतरांकडून काहीही हवे नसते पण,त्या प्रसंगी जेव्हा कुटुंबातील लोकचं दोन शब्दाचा आधार देत नसतील त्यावेळी तो माणूस मनातून पूर्णपणे तुटून गेलेला असते. तरीही चेहऱ्यावर हास्य ठेवून होणारा सर्वच त्रास सहजपणाने सहन करत असतो. तीसरा होणारा त्रास म्हणजेच तो माणून स्वार्थी नसतो कोणाचीही अपेक्षा न करता एक, एक रुपये जमा करून जगत असतो प्रत्येक संकटाचा सामना करत असते ऐन त्याच वेळी आर्थीक अडचणी सुध्दा खूप त्रासदायक असतात तरीही तो माणूस आपला स्वाभिमान कुठेही विकत नाही उलट जगून दाखवतो व त्या कठीण प्रसंगी सुध्दा इतरांच्याच विषयी विचार करत असते त्यात एक गोष्ट अशी की मागे गेलेल्या काही वर्षात थोडेतरी जाऊन बघावे त्या काळात जे,होऊन गेलेले थोर संत, महात्मे, महापुरूष सर्व महाविभूती होते त्यांना समाजाने त्रास देण्यासाठी एकही संधी सोडली नाही, त्यांना सुखानी जगू दिले नाही, घुटभर पाण्यासाठी त्यांना गांजून सोडले होते, वरतून निंदा, चुगली, शिव्या, वारंवार हसणे, वाटेत संकट बनून अडविणे हे त्यांना फार प्रमाणात जमत होते तरीही त्या सर्व महाविभूंतीनी समाजाकडून होणारा त्रास हसत, हसत सहन केले आणि याच समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जगले आज त्यांनाच प्रत्येक माणूस दररोज वंदन करत आहे कारण त्यांनी सत्याचा स्वीकार केले होते व सत्याच्या वाटेवर चालून माणव जीवनाचे कल्याण केले होते म्हणूनच आजचा प्रत्येक माणूस दोन घास सुखाने खात आहे व जगत सुध्दा आहे ही सारी देण त्या महाविभूंतीचीच आहे. 

      म्हणूनच सर्वात जास्त त्रास त्यालाच सहन करावा लागतो ज्याच्याच सहन करण्याची ताकद असते आणि त्यासाठी जन्म घ्यावा लागतो व तेव्हाच जीवनाचे सार्थक होते पण,हे सर्वानाच जमत नाही किंवा प्रत्येकांच्याच वाट्याला येत नाही कारण सत्य स्वीकारणे एवढे सोपे नसते जेवढे खोटे सहजपणे बोलले जाते व खोट्याला साथ दिल्या जाते हे फार सोपे काम आहे म्हणून आजचा माणूस स्वत:मध्ये शोधण्याचा प्रयत्न करत नाही पण,दुसऱ्यांच्या चुका मात्र काढून त्याचे जीवन नरकासारखे करण्यासाठी वैऱ्यासारखा हातधुवून मागे लागत असतो व त्याच्यावर वारंवार हसून गावभर त्याच्याविषयी डिंडोरी पिटत असतो हे वास्तव सत्य आज सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या माणसांच्या दैनदिन जीवनात येतांना दिसत आहेत तरीही तो माणूस जगण्याचा प्रयत्न करत असते. एक गोष्ट मात्र खरी आहे तोच माणूस अभिमानाचे दुसरे नाव असते कारण त्रास त्यालाच सहन करावा लागतो जो सत्याला पूर्णपणे समर्पीत होऊन जातो,,निंदकाला आपला गुरू मानतो आणि संघर्ष करत राहतो पण,मागे वळून बघत नाही किंवा कोणाचे वाईट चिंतत नाही, प्रसिद्धीच्या मागे धावत नाही, खोटे कधीही बोलत नाही, म्हणून कोणत्याही माणसांनी उगाचच कोणाला त्रास देण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा अशा वाटेवर चालत रहावे जी वाट जीवनाचे सार्थक करणारी असावी अशीच माणुसकी व असेच कार्य असावेत जिथे स्वत:चा तर..उद्धार होईलच पण,इतरांनाही तिथून दिशा मिळेल तोच मार्ग स्वीकारावा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here