छत्रपती करिअर अकॅडेमीतील पाच विद्यार्थ्यांची रायगड पोलीस व पालघर जिल्ह्यात भरती

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

माणगांव :-माणगांवमध्ये असणाऱ्या छत्रपती करिअर अकॅडमी आर्मी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थीची नुकतीच पोलीस दलात भरती झाली असून त्याच्यावर संपूर्ण माणगांव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

छत्रपती करिअर अकॅडमी आर्मी व पोलीस भरती पूर्व हे जवळपास सहा वर्षापासून कार्यरीत आहे. ग्रामीण भागातून विद्याथ्यांना घडविन्याचे काम ही अकॅडमी करीत आहे. या अकॅडमीतर्फे संस्थापिका माधुरी निवास साबळे व सर्व शिक्षक वर्ग हे चांगल्या प्रकारे आर्मी व पोलीस भरतीची पूर्व शिक्षण देत असतात गेल्या सहा वर्षात आतापर्यंत १०० विद्यार्थी पोलीस दलात भरती झाले असून ते आतापर्यंत शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.

तर आता यावर्षी सुद्धा छत्रपती करिअर अकॅडमीतुन पाच विद्याथ्यांची रायगड पोलीस दलात व पालघर पोलीस दलात नुकतीच भरती झाली आहे. यामध्ये अभिषेक पारधी, साईराज लिमकर,उद्या उदय शिंदे, ज्योतिका पागसे हे चार विद्यार्थी रायगड पोलीस दलात तर वैष्णवी पारधी ही पालघर पोलीस दलात भरती झाली आहे. या सर्व विद्याथ्यांचा छत्रपती करिअर अकॅडमी आर्मी व पोलीस भरती च्या संस्थापिका माधुरी निवास साबळे व सर्व विद्यार्थी शिक्षकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here