जळगाव प्रहार अनाथ संघटना यांच्या तर्फे महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देण्यात आले.

विशाल सुरवाडे ✒
जळगाव जिल्हा प्रतिनिधी 
जळगाव,दि.19:- जळगाव प्रहार अनाथ संघटना यांच्या तर्फे महापौर सौ जयश्रीताई महाजन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात त्यांनी सांगितले आहे की, 18 वर्षानंतर बाहेर पडलेल्या अनाथांची परिस्थिती आधीच अतिशय बिकट असून शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेला घटक आहे . छोट्या-मोठ्या मोठ्या व्यवसायाकडे हात मजुरी करून आपल्या हातावर पोट भरणारा हा अनाथ घटक आहे. सध्या त्याच्यावर उपासमारीची वेळ येत आहे त्यात गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशात covid-19 या विषाणूने थैमान घातले आहे. अशातच शासनाकडून निर्बंध आणि लॉक डाऊन नेहमीच घोषित होत आहे. सदर काळात अनाथांचे जगण्याची वांदे झाले आहेत त्यांना बाहेर भाड्याने रुम करून राहणे व जेवणाची सोय करणे सुद्धा कठीण झाले असून जगावं की मरावं असा प्रश्न पडला आहे.

तरी 18 वर्षावरील अनाथांना आपल्या राहण्याची आणि जेवणाची सोय करता यावी यासाठी दरमहा किमान दोन हजार रुपये पोटगी म्हणून देण्यात यावी. अशी मागणी याद्वारे करण्यात आलेली आहे. व महापोैर यांनीं सकारात्मक भूमिका या वेळी पष्ट केली लवकरच या अनाथ मुलं मुलींना 2000 रुपे पोटगी भत्ता देऊ असं आश्वाशन त्यांनी त्या वेळी दिल.

निवेदन देताना अमोल पाटील, अनाथ प्रहार संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष व संघपाल किर्तीकर अनाथ प्रहार संघटना जळगाव, उपजिल्हाध्यक्ष आणि भूषण पिंगळे, तालुकाध्यक्ष एरंडोल शुभम सोनवणे, महेंद्र नागरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here