भूमिपुत्र शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणार नाही

भूमिपुत्र शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणार नाही

भूमिपुत्र शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणार नाही

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀
हिंगोली:- गोरेगांव

गोरेगाव ता.सेनगाव जि. हिंगोली येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना हिंगोली जिल्हा तथा परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित रस्ता रोकोला भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी संबोधीत केले. भूमिपुत्र शेतकरी संघटना हिंगोली जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या कायम पाठीसी आसुन संकटात शेतकऱ्यांना भूमिपुत्र कदापीही वार्‍यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी हजारो शेतकऱ्यांसमोर दिली. जिल्ह्य़ातील गोरेगांव आणि परिसरातील अनेक मंडळे अतिवृष्टीच्या मदती पासुन वंचित आसल्यामुळे शेतकऱी सातत्याने पाठपुरावा करीत होते. प्रशासनाकडून प्रतीसाद मिळत नसल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी अंदोलनाचे हत्यार उपसले. गेल्या चार दिवसांपासून गोरेगांव येथिल मंडळ कार्यालया समोर शेतकर्यांनी ठिया दिलेला आहे. तर त्यांना समर्थन देण्यासाठी काल शेतकऱी व परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून रस्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून रस्ता रोकोला पुर्ण समर्थन देण्यात आले. भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य संघटक डाॅ.जितेंद्र गवळी, वाशिम जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, वाशिम युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, सेनगाव तालुका अध्यक्ष संतोषआण्णा खोडके, सर्कल अध्यक्ष राधेश्याम कावरखे, गजानन काकडे सह हिंगोली जिल्ह्य़ातील व सेनगाव तालुक्यातील भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. अनिल पंतगे, अमोल पाटील यांनी रस्ता रोको साठी प्रयत्न केले. अंदोलनाला पोलीस प्रशासनाकडून डि.वाय.एस.पी. पाटील मॅडम, सेनगावाचे तहसीलदार, गोरेगांवचे ठाणेदार जाधव साहेब सह महसुल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.✍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here