online-learning-websites-in-india
नव्या वर्षात शिका नवे कोर्स अगदी मोफत...देशविदेशातील कॉलेजमधील कोर्स मोफत शिकण्यासाठी भेट द्या या वेबसाईट्सना.
online-learning-websites-in-india
नव्या वर्षात शिका नवे कोर्स अगदी मोफत…देशविदेशातील कॉलेजमधील कोर्स मोफत शिकण्यासाठी भेट द्या या वेबसाईट्सना.

सिद्धांत
३० डिसेंबर २०२१: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना पँडेमिकमुळे जगभरातील शाळा, विद्यापीठे बंद आहेत. अश्यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून अनेक शाळा, कॉलेजेसनी ऑनलाईन शिकवणी घेण्यास सुरुवात केली. दुर्गम भागातील, इंटरनेट आणि साधनांचा अभाव असलेल्या विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान झाले असले तरी, डिजिटल सोयीसुविधा असलेल्या विद्यार्थ्यांना याचा उत्तम फायदा झाला आहे. गेल्या दोन वर्षात ऑनलाईन लर्निंग क्षेत्रात विलक्षण सुधारणा घडून आली असून अनेक शैक्षणिक संस्थांनी आपले कोर्स विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.

पारंपरिक पुस्तकी अभ्यासक्रमाऐवजी ऑनलाईन कोर्स मध्ये ऑडिओ – विडिओ माध्यमांचा समावेश असल्याने विद्यार्थी अधिक आवडीने अभ्यासात रमतात असे आढळून आले आहे. त्यामुळे अगदी ऑक्सफर्ड, एमआयटी, हार्वर्ड सारख्या जगभरातील नावाजलेल्या विद्यापीठातले कोर्स देखील विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्सवर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. नव्या वर्षात नवीन कोर्स शिकण्यासाठी अश्याच काही वेबसाइट:

1.edX: हार्वर्ड विद्यापीठ आणि एम.आय.टी या अमेरिकेतील विद्यापीठांनी edX ऑनलाईन शिक्षणाच्या प्लॅटफॉर्मची २०१२ मध्ये स्थापना केली. आज जगभरातील १६० पेक्षा अधिक संस्थांचे ३००० पेक्षा जास्त कोर्सेस ह्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. विशेषतः कॉम्पुटर सायन्स, डेटा सायन्स, बिझनेस मॅनेजमेंट, आर्ट या क्षेत्रातील अनेक मोफत कोर्सेस विद्यार्थ्यांना इथे शिकायला मिळतात.
वेबसाइट लिंक : https://www.edx.org/

2.Coursera: “शिका कोणत्याही बंधनाविना” हे घोषवाक्य असलेल्या Coursera या प्लॅटफॉर्मची स्थापना स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधील दोन प्रोफेसरांनी केली होती. विशेष म्हणजे गूगल, फेसबुक, आयबीएम सारख्या जागतिक कंपन्यांचे मान्यताप्राप्त कोर्सेस ह्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. ह्यामध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स, डिग्री कोर्स तसेच अनेक जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.भारताच्या आयआयटी संस्थेचे सर्टिफिकेट कोर्सेस ही भारतीय विद्यार्थ्यांसाठी ह्या प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.
वेबसाइट लिंक : https://www.coursera.org/in

3.Udemy: ६० हजारांपेक्षा जास्त शिक्षक, जगभरातील ७५ निरनिराळ्या भाषांमधून जवळपास पाऊणे दोन लाखांपेक्षा जास्त कोर्सेस Udemy या प्लॅटफॉर्मवरून विद्यार्थ्यांना शिकवत असतात. नेटफ्लिक्स, टाटा, वर्डप्रेस सारख्या कंपन्यांचा या प्लॅटफॉर्मला सपोर्ट असून सध्या या प्लॅटफॉर्मवर नवीन वर्षाच्या आकर्षक ऑफर चालू आहेत. कॉम्प्युटर सायन्स, बिझनेस मॅनॅजमेन्ट सारख्या विषयावरील तीन – चार हजार फीस असलेले कोर्सेस सध्या केवळ ३५० रुपयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी Udemy कडून उपलब्ध करण्यात आले आहेत.
वेबसाइट लिंक: https://www.udemy.com/

4.Upgrad: पदवीधर आणि आपल्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या लोकांसाठी शिक्षणाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी अपग्रेड आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे मदत करते. भारतामध्ये स्थापन झालेल्या या प्लॅटफॉर्मवर डेटा सायन्स, एम.बी.ए., मार्केटिंग सारख्या विषयांवर मास्टर्स, डॉक्टरेट सारखे कोर्स व्हिडिओ, लाईव्ह क्लासेसच्या माध्यमांतून उपलब्ध आहेत.
वेबसाइट लिंक: https://www.upgrad.com/

5.Skillshare: स्किलशेअर हा कलाकारांचा प्लॅटफॉर्म आहे. इथे सायन्स, टेक्नॉलॉजी सोबतच चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, फॅशन डिझाईन यांसारखे क्रिएटिव्ह कोर्सेस शिकायला मिळतात. जगभरातील एखादी चविष्ट डिश बनवायला तुम्हाला शिकायचे असेल किंवा गिटार कसे वाजवायचे हे तुम्हाला शिकायचे असेल, Skillshare वर या संबधीचे विडिओ तुम्हाला अगदी सहज तुम्हाला तुमच्या भाषेत पाहायला मिळतील. हसत खेळत तुमच्या लहान मुलांना एखादे नवीन कौशल्य शिकवायचे असल्यास किंवा तुम्हाला एखादा प्रोफेशनल कोर्स ऑनलाईन शिकायचा असल्यास त्यासाठी Skillshare हा प्लॅटफॉर्म एक उत्तम पर्याय आहे.

वेबसाइट लिंक: https://www.skillshare.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here