कोल्ह्याट्याचं पोर
कोल्ह्याट्याचं पोर

विशाल गांगुर्डे, बदलापूर
मोब. नं :- 9768545422

मुंबई: गेल्यावर्षी सातारा भागात मित्रांसोबत जेजुरीच्या जत्रेत गेलो होतो. माझ्यासोबतचे सर्व मित्र माझ्यासहित नास्तिक असल्याने तेथे आम्ही श्रद्धेने न जाता एक पिकनिक म्हणून गेलो होतो. त्यामुळे मित्र सोबत असल्यावर मजा, मस्ती, एन्जॉयमेंट होणारच. तिथं रात्री एक लावणीचा फड लागला होता. मी कधी या लावण्यांच्या फडात गेलो नव्हतो. त्यामुळे पहिल्यांदाच मित्रांसोबत त्या फडात प्रवेश केला होता. आम्ही जायच्या आधीच त्या आतील मैदानात किमान शे-दोनशे लोक अगोदरच फडात तिकीट काढून बसलेली होती. आम्ही गेल्यावर काही मिनिटाने तो कार्यक्रम चालू झाला. स्टेजची रोषणाई ही डोळ्यांना मोहणारी होती. हा लावण्याचा फड नुकत्याच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांसकडून वयोजेष्ठ कलाकार पुरस्कार मिळवलेल्या सौ.मंगला बनसोडे यांचा होता व पहिल्यांदाच त्यांना लाईव्ह परफॉर्मन्स करताना बघत होतो. स्टेज वर नाचत असलेल्या इतर नाचणारींना बघून प्रेषक हे त्यांचा स्टेज वर जात आणि जवळ जावून शिट्या वाजवत तर कोण त्यांना पैसे देण्यासाठी स्टेज वर चकरा मारत. टीव्हीवर, चित्रपटात जुन्या पाहिलेल्या लावण्या पार्ट्यापेक्षा आताच्या लावणी फडाला ग्लॅमर लूक आला आहे.

या लावण्या नाचणाऱ्या स्त्रीयांमध्ये कोल्हाटी समाजाातील स्त्रीयाचे प्रमाण अधिक आहे. हे मला आधीपासूनच माहिती होते. हा कोल्हाटी समाज त्यातील स्त्रिया या नाचगाण्यांवरच आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जातीव्यवस्थेत खितपत पडलेली सामाजिक व आर्थिक परिस्थिती त्यामुळे या कोल्हाटी समाजाबद्दल मला कुतूहल होतं. त्यामुळे या समाजाच्या व्यथा, दुःख, दारिद्र्य, सामाजिक परिस्थिती अशा या शोषित समाजाबद्दल माहिती मिळवायची ओढ लागली होती. याच माहितीच्या शोधात असताना मला लेखक किशोर शांताबाई काळे यांच आत्मकथन ‘ कोल्ह्याट्याचं पोर’ हे पुस्तक हाती लागलं. त्यांच्या या पुस्तकात स्वतः लेखक किशोर काळे यांचा डॉक्टर बनण्याचा प्रवास समाजव्यवस्थेला हादरा देणारा होता. आजही कित्येक कोल्हाटी समाजातील स्त्रिया या नाचगाण करूनच आपला उदरनिर्वाह करतात. दुसरीकडे पुरुष मात्र व्यसनात बुडालेले दिसतात.या दुष्ट जातीव्यवस्थेमध्ये नाचगाण करणे अगोदर हीन दर्जाचे काम समजले जायचे. त्यामुळे तेव्हाचे समाजधुरीण हे स्त्री नाचताना त्यांच्यावर पैसे उधळत, तर कधी मानवी मन मेलेल्या या स्त्रियांच्या शरीराचा उपभोग समाजधुरीन, सावकार घेत असत. त्याला मात्र कोणाकडून विरोध होत नव्हता. दिवसाढवळ्या होणाऱ्या अमानुष छळाला जातीव्यवस्था पाळणाऱ्या लोकांकडून डोळे झाक करून दिलेली मान्यताच होती. त्यामुळे अशा स्त्रियांच्या पोटी जन्म घेतलेली मुलं बेवारस म्हणूनच जन्माला येई. त्यामुळे अशा मुलांना बापच नसे. त्यामुळे या पुस्तकाचे लेखक सुद्धा बापाच्या जागी आपल्या आईचे नाव लावत होते.

या फडात नाचणाऱ्या स्त्रिया या फुलांसारख्या असतात, जो पर्यंत फुलाला वास आहे तो पर्यंत त्या फुलाला जवळ केले जाते . एकदा त्याचा वास गेल्यावर व कोमेजल्यानंतर त्याला पायदळी तुडवले जाते. त्यामुळे सत्तरी ते नवद्दीच्या काळात या स्त्रियांवर तारुण्यात सावकार, गावचे पाटील, राजकारणी,गावचे दादा हुकूमतच गाजवत असत. त्यामुळे नाचणारीन स्त्रिया त्यांचासाठी बाहुल्याच होत्या. त्यामुळे अश्या स्त्रियांचे विदारक जगणं त्यासोबत जातीव्यवस्था तोडून अन्य काम न करण्याची जात बांधवांची बंधन त्यामुळे हा समाज पूर्णत्व गुलाम झाला होता. शोषणाने पिळला गेला होता. त्यामुळे जातीभेदाच्या चटक्याने स्त्रियांना व ना पुरुषांना हवे तसे वागण्याचे स्वंतत्र नव्हते. त्यामुळे या समाजातील बरेच स्त्रियांना उच्च जातीतील पुरुषांच्या रखेल म्हणूनच आपलं जीवन व्यथित करावं लागत. त्यामुळे अशा आईच्या पोटी जन्म घेणे म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य घेऊनच जन्माला येणे होय. त्यामुळे लेखकाच्या जिंदगीचा खडतर प्रवास वाचताना अक्षरशः मनाला सुन्न करणारे विदारक चित्रच डोळयांसमोर उभे राहते. कोल्हाटी स्त्रियांना रांड, वेश्या,रखेल या शिव्या त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग सोडत नाही.

 

हे आपण वाचलंत का?

 

कोल्हाटी समाजात घरात मुलगी चार वर्षाची झाल्यावर तिला नाचगण्याला व मुलाला ढोलकी वाजवण्यास पाठवतात. त्यामुळे अशा कुटुंबात शिक्षणाला काहीच प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे अशा कुटुंबात राहून उच्च शिक्षण घेणे म्हणजे जातीव्यवस्थेशी केलेला विद्रोहच आहे. त्यात आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने शिक्षण घेणे सुद्धा एक मोठं आव्हानच आहे. त्यामुळे एक एक पैसा लेखकाला शिक्षणासाठी जमा करावा लागत होता. त्यामुळे लेखकाने मिळेल ती कामे केली आहेत. घरात बहुतांश पुरुष व काही स्त्रिया सुद्धा व्यसनाधीन असल्याने कधी कधी शिक्षणाला जमा केलेले लेखकाचे पैसे सुद्धा घरातील व्यसनी आजोबाकडून दारूपायी उडवले जाई. तरी सुद्धा अशा अंधश्रद्धाळू व शोषित असलेल्या वर्गातून प्रथम डॉक्टर बनणे अगदी अवघड कामच आहे. त्यामुळे लेखकाने पुस्तकात यथोचित सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत दुःखच वर्णिलेले आहे.

तरीसुद्धा लेखकाने जातीव्यवस्थेच्या पारंपरिक व्यवसायातुन बंड करत वैद्यकीय पेशा स्वीकारणे हे सुद्धा एक प्रकारे जातीव्यवस्थेला हादरा देणे व सुरुंग लावणेच होय. त्यामुळे त्यांनी दिलेला हादरा त्यांच्यासारखा कोल्हाटी किंवा अन्य शोषित समाजातील विद्यार्थ्यापुढे त्यांचा एक आदर्शच उभा राहतो.

– (लेख पूर्वप्रसिद्धी : १ फेब्रुवारी २०१८)

https://www.instagram.com/p/CaB0h5Cq4c8/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here