महात्मा फुले: थोर विचारवंत व महान समाज सुधारक महापुरुष

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो: 9921690779

महात्मा फुले हे महान समाजसुधारक होते.त्याच्याच प्रयत्नातून आपल्याला आज समाजात एकता व बंधुता दिसून येते.महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला सातारा जिल्ह्यातील  कटगुण या गावी झाला.जन्मताच समाज सुधारणेची तळमळ त्यांच्यामध्ये होती.त्यामुळे आज संपूर्ण भारतात महात्मा फुले यांना समाजसुधारक म्हणून मोठ्या आदरतीत्थाने ओळखले जाते.महात्माफुले कर्तृत्ववान महापुरुष होते.त्यामुळेच त्यांच्यात आपल्याला समाज सुधारणेचे संपूर्ण गुण पहायला मिळतात.

महात्मा फुले सामाजिक प्रबोधनकार, भारतीय सामाजिक कार्यकर्ते,महान विचारवंत, समाजसुधारक, उत्कृष्ट लेखन, स्त्रियांना व समाजातील लोकांना शिक्षीत करने,जातीय व्यवस्थेचे निर्मुलन इत्यादी अनेक महान कार्याने आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या सन्मानाने महात्मा फुलेंना ओळखले जाते.त्यामुळेच आज संपूर्ण भारत त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होतो.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना फुले त्यांच्या सोबत रहात असत.त्यामुळे सामाजिक कार्यात त्यांचा सुध्दा तेवढाच महत्त्वाचा वाटा दिसून येतो.सावात्रीबाई फुले भारतातील पहील्या महीला शिक्षणाच्या जनक होत्या.आज महाराष्ट्रात शिक्षणामध्ये जी काही सुधारणा, आमुलाग्र बदल व विविधता दिसून येते त्यांचे संपूर्ण श्रेय महात्मा ज्योतिबा फुलेंना व सावित्रीबाई फुलेंना जाते

महात्मा जोतिबा फुले यांचे एवढे महाण कार्य आहे की महाराष्ट्रासह संपूर्ण भारत कधीच विसरणार नाही.कारण सन १८६९ साली महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम पोवाडा लिहिला.शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी फुलेंनी सन १८७० साली शिवजयंतीची सुरूवात केली. ती पहीली शिवजयंती होती.त्यानंतर शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले. २० व्या शतकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली व दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटात शिवजयंतीला सुरूवात झाली.

म्हणजेच महात्मा जोतिबा फुले समाजसुधारक तर होतेच परंतु शिवरायांच्या समाधीचा शोध लावुन इतिहास जागृत केला त्यामुळे त्यांच्यात आपल्याला दैवी शक्तीचे रूपही पहायला मिळते.अशा क्रांतिकारक महान समाजसुधारक ज्योतिबा फुलेंना कोटी कोटी प्रणाम. महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाज सुधारण्यासाठी दिशा दिली व समाजामध्ये सुधारणा झाल्याचे आपण पहातो. त्याचप्रमाणे आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज निसर्गाला वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे.कारण आज समाज अत्याधुनिक युगाकडे वाटचाल करीत आहे.परंतु दिवसेंदिवस निसर्गाचा ह्यास होत आहे.त्याला वाचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.त्यामुळे जयंती निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे अत्यंत गरजेचे आहे.यातच आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचे आचार-विचार अवश्य दिसून येईल व प्रत्येक झाडाच्या पानात, फळात,फुलात महात्मा फुलेंचे दर्शन अवश्य होईल.जय हिंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here