पत्रकारांनी आवश्यक ठिकाणी आपल्या लेखणीची धार अधिक तीव्र करावी: राज्यपाल कोश्यारी

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.20 जुलै:- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सत्य पत्रकारतेने अनेक सत्ता नस्तेनाबुत झाल्याचा इतिहास आहे. पण आज देशात पत्रकारांवर अनेक स्थिकानी प्रश्न उपस्थीत केले जात आहे. आणि त्याला कारण पण आहे. काही पत्रकार आपली लेखणी सत्तेच्या पाया खाली ठेऊन सत्तेच्या ताटा खालचे मांजर झाल्याचे सोंग घेऊन फिरत असल्याचे दिसून येते. तर काही प्रामाणीक पत्रकार हे आपल्या लेखनीच्या ताकतीने अन्याय, अत्याचारावर प्रहार करत आहे सत्य प्रकाशीत करत आहे.

मुंबईत अशा प्रामाणीक आणि निर्भय पत्रकाराचा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणारा 2020 चा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण राजभवन येथे भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी “पत्रकारांनी आवश्यक ठिकाणी आपली लेखणीची धार थोडी अधिक तीव्र करावी. पत्रकार हा आपल्या विचारांनी समाज घडवत असतो. समाजात ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे,” असं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “पत्रकारिता ही जोखीम असली तरी समाज घडविण्यासाठी ही जोखीम महत्वाची आहे. समाजातील चांगल्या गोष्टी ज्याप्रमाणे पुढे आल्या पाहिजेत तेवढेच वाईट देखील समोर आले पाहिजे. त्यामुळे पत्रकारांचा समग्र दृष्टीकोनातून पत्रकारिता केली तर ती समाजाला निश्चीतच मार्गदर्शक असेल. एक सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अशी पत्रकारिता महत्वाची आहे. पुरस्कार विजेत्या पत्रकारांचे यावेळी राज्यपालांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here