नागपंचमी एक उत्सव म्हणून साजरा करा

        नागपंचमी हा हिंदूचा सण म्हणून साजरा केला जातो.पण हा हिंदूचाच सण नाही तर तो सर्व धर्मीयांचा सण आहे.जे जे नागाला मानतात.पण आम्ही तसे न समजता या सणाला हिंदूचा सण म्हणून मर्यादा घातलेली आहे.

         मुळात साप दिसला की माणसाच्या मनात धस्स होतं.कोणी धडधाकट असला तर त्याची मारायची इच्छा होते.कोणी म्हणतात साप विषारी आहे.मारलेले बरे.असे असंख्य साप मारले जातात.साप हा शेतक-यांचा शत्रू असला तरी.

       सापाच्या प्रजातीत नाग ही देखील प्रजाती मोडते.नाग हा सापाचा वंश.पण या भारतात पुर्वी नागवंश होता.या नागवंशीय लोकांचा व सापाचा काही संबंध जरी नसला तरी ही नागवंशीय मंडळी साप पालन करीत असल्याने या नागवंशीयांनाच पुढे सापाचे वंशज मानण्यात आले.

          सापांना पुर्वी मारत असत.विषारी आहे हे पाहून.काही कालखंडानंतर समजलं की हे साप विषारी जरी असले तरी ते शेतक-यांचे मित्रच आहेत.म्हणून सापाला मारणे बंद करावे.तरीही सापाला मारणे बंद झाले नाही.म्हणून लोकांनी साप मारणे एक दिवस तरी बंद करावे यासाठी नागपंचमी उत्सव मनविण्यात येवू लागला.पण हे मुळ कारण जरी असलं तरी पुढील काळात याला आध्यात्मिक पार्श्वभूमी मिळाली.

        नागपंचमी हा सण साजरा करण्यामागे काही आध्यात्मिक पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे

        १)श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करुन ज्या दिवशी परत आला.तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो.

        २)तक्षक नागाने अपराध केला.या अपराध्याला शिक्षा म्हणून राजा जनमेजयान याने सर्पयज्ञ केला,तेव्हा तक्षक इंद्राला शरण गेला.पुढे ओम इंद्राय स्वाहा म्हणत राजाने अग्नीत इंद्राचीही आहूती दिली.अर्थात अपराधीला शरण देणाराही तेवढाच दोषी समजत राजाने ते कृत्य केले.निश्चीतच सापाची संख्या कमी होत होती.हे अास्तीक मुनीच्या लक्षात येताच त्यांनी घोर तप केले.या तपातून त्यांनी राजा जनमेजयानला प्रसन्न केलं.राजा जनमेजयानने आस्तीक मुनीला वर मानायला लावला.त्यात या मुनींनी सर्पयज्ञ थांबवण्याची विनंती केली.तो दिवस नागपंचमी उत्सव म्हणून साजरा होतो.

         ३) सत्येश्वरी नावाची कनिष्ठ देवी.सत्येश्वर नावाचा तिचा भाऊ.त्याला सापाने दंश करताच त्याचा मृत्यू झाला होता.दुस-या दिवशी ती भाऊ मरण पावल्याने शोकसागरात डुबली होती.पण प्रत्यक्ष नागराजाने सत्येश्वरीच्या रुपात येवून सत्येश्वरीला दर्शन दिले व घाबरु नको मी इथेच आहे म्हणत ते अंतर्धान पावले.त्यातच या सत्येश्वर रुपातील नागराजाने सत्येश्वरीला नवीन कपडे दिले.त्यामुळे या दिवशी स्रीया नवीन कपडे घालतात.नागदेव प्रसन्न झाल्यावर सत्येश्वरीने वचन मागीतले.ते वचन सत्येश्वरीच्या हातावर उमटले.तीच मेहंदी होय.स्रीया या दिवशी मेहंदीही लावतात.नागराज अंतर्धान पावत दुस-या दिवशी भेटण्याचे वचन देवून गेला.शोकसागरातून बाहेर निघतात सत्येश्वरी या नागराजाला शोधायला जंगलात गेली.तेव्हा जंगलात सत्येश्वराने दर्शन दिले.तेव्हा जंगलात वेलीवर आपल्या बहिणीला सत्येश्वराने झोकेही दिले.अर्थात या दिवशी स्रीया झोकेही खेळतात.

        ४)चौथी आध्यात्मिक गोष्ट म्हणजे एका शेतक-याने या दिवशी शेतीत नांगरणी केली.त्यात तीन सापाची पिल्लं मरण पावली.म्हणून क्रोधी झालेल्या नागीणीने बदल्याच्या भावनेने रात्री येवून दोन बहिणी,तो शेतकरी व त्याच्या पत्नीला चावा घेतला.पण एक बहिण सुटली.त्यामुळे तिलाही दंश करण्यासाठी ती नागीण दुस-या दिवशी आली.तेव्हा तिनं पाहिलं की या तिस-या मुलीनं आपल्यासाठी दुध ठेवलं आहे.पुजाविधीही केलेला आहे.इत्र फवारले आहे.हे पाहून नागीण खुश झाली व तिने तिच्या संपुर्ण परीवाराला जीवंत केलं.तो नागपंचमीचाच दिवस होता.

          नागपंचमीचं आध्यात्मिक महत्व सापाला लोकांनी मारु नये म्हणून……..पण आजही सापं भयमुक्त नाहीत.सापाला लोकं मारतात.त्याची तेवढीच तस्करीही करतात.त्याची कातडी विकतात.नव्हे तर जहरही.त्या जहराचा वापर एक नशा म्हणून केला जातो.

        मुळात या नागपंचमीच्या दिवशी सापाला इजा होवू नये म्हणून आम्ही भाजी चिरत नाही.कोणत्याही वस्तू चिरत नाहीत.नव्हे तर घनोले वा लाह्यांचा प्रसाद सापाला चढवतात.एवढेच नाही तर या सापाला दूधही आम्ही ठेवतो.पण साप दूध पित नाही.पेल्यास त्याची पचनशक्ती कमजोर होवून त्याला फुफ्फुसाचा त्रास होतो.त्यातच साप मरतात.अर्थात दूध हे सापासाठी विषारी आहे.पण आम्हाला मुळात आध्यात्मिकतेने भाळून ठेवले आहे.सापाला थोडं दूध पाजायचं आहे असे म्हणत दूधासाठी सापाला घेवून फिरणारे गारुडी आम्ही पाहिले आहेत.हे गारुडी सापाचे तोंड शिवतात व त्यांना घेवून फिरतात.आलेल्या पैशातून दारु पितात.गांज्या पितात.नव्हे तर इतर काही शौकंही.म्हणून सरकारने साप पकडण्यावर बंदी घातली आहे.

आजही नागद्वारी वारीला जाणा-या कित्येक भक्तांना हे गारुडी सापाची भीती दाखवत अडवतात आणि हवे तेवढे पैसे वसूल करतात.आजही अंधभक्त नागाच्या मंदीरात जातात आणि घराकडे नाग निघाल्यास मारतात.तर आजही नागपंचमी हिंदूचाच सण मानून ब-याच इतर धर्मातील लोकं नागाला पूजत नाहीत.तर विदेशी या सापाकडे खाण्यायोग्य वस्तू म्हणून पाहतात.मुळात साप हा विषारी असला तरी तो शेतक-याचा मित्र आहे असे मानणारा समाज जिथे जिथे आहे.मग तो विदेश का असेना.सापाची पुजा नको.पण सापासाठी एक दिवस तरी द्यायलाच हवा.मग तो नागपंचमी म्हणून नाही तर इतर दिवस म्हणून प्रत्येक धर्मीयांनी पाळण्याची गरज आहे.

निदान भारतात तरी नागपंचमी म्हणून का असेना, या दिवशी सापाला इजा होवू नये म्हणून हा उत्सव पाळण्याचे बंधन असावे. नागपंचमी हिंदूचा सण म्हणून नाही तर एक उत्सव म्हणून तरी हा सण साजरा करा.आपला एक शेतक-यांचा मित्र म्हणून…

अंकुश शिंगाडे, नागपूर

मो: ९३७३३५९४५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here