कोकणातील पहिले ड्रोन द्वारे शेतीवरील किटकनाशक फवारणीच्या प्रात्यक्षिकाचा मान रायगड जिल्ह्यात माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र, रेपोली येथे पार पडले पहिलं प्रात्यक्षिक

कोकणातील पहिले ड्रोन द्वारे शेतीवरील किटकनाशक फवारणीच्या प्रात्यक्षिकाचा मान रायगड जिल्ह्यात

माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र, रेपोली येथे पार पडले पहिलं प्रात्यक्षिक

कोकणातील पहिले ड्रोन द्वारे शेतीवरील किटकनाशक फवारणीच्या प्रात्यक्षिकाचा मान रायगड जिल्ह्यात माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र, रेपोली येथे पार पडले पहिलं प्रात्यक्षिक

*दिपक दपके*
*माणगाव शहर प्रतिनिधी*
*मो, 9271723603*

गेल्या काही महिन्यांपासून (Drone Farming) ड्रोनचा शेती व्यवसायात वापर करण्याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यामुळे किटकनाशकांवर फवारणी करण्याचा कोकणातील पहिला उपक्रम असून त्या अनुशंगाने कृषी संशोधन केंद्र, रेपोली येथे आज शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे प्रात्याक्षिक दिले गेले. शेती व्यवसायात आत्याधुनिक यंत्राचा वापर वाढवून शेतकऱ्यांची वेळ बचत व्हावी शिवाय कष्टही कमी करण्याच्या हेतूने ड्रोन शेतीवर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर आता शेतकऱ्यांना धडे दिले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील रेपोली येथील कृषी संशोधन केंद्र, रेपोली येथे शेतकऱ्यांना ड्रोन शेतीविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले आहे. कृषी संशोधन केंद्र व कृषी विभागाच्या माध्यमातून या अत्याधुनिक शेतीबाबत जनजागृती केली जात आहे २० मिनिटांमध्ये ४ एकरावरील फवारणी ड्रोन शेती हा शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्रम आहे. त्यामुळे त्याची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून तज्ञ मंडळीला आमंत्रित केले होते. डॉ. व्ही. एन. जालगांवकर, किटकशास्त्रज्ञ तथा प्रा. कृषि. संशोधन केंद्र कर्जत यांनी ड्रोनच्या वापर तसेच तांत्रिक बाबीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय ड्रोन शेतीचे फायदेही शेतकऱ्यांना सांगण्यात आले. ड्रोनद्वारे २० मिनिटांमध्ये ४ एकराचे क्षेत्र फवारणी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि कष्टामध्येही बचत होणार आहे. शेतकरी ठिबक सिंचन आणि विविध प्रकारच्या यंत्रे भारतातील शेतीसाठी वापरली जात आहेत. ड्रोन आता शेतीमध्ये औषध फवारणी करताना महत्त्वाचा ठरणार आहे. ड्रोनमुळे पीक फवारणीसाठी लागणारं मनुष्यबळ नक्कीच कमी होईल. तसेच पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचे प्रमाण ड्रोन वापरण्यापेक्षा कमी होणार आहे.

सदर ड्रोन किटकनाशक फवारणीच्या प्रात्यक्षिकावेळी श्री. अंकुश माने ( विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग), डॉ. नरंगळकर ( किटकशास्त्र विभाग), श्रीमती. उज्वला बानखेले (जिल्हा कृषि अधिक्षक, अलिबाग) डॉ. एस्. बी. भगत, डॉ. व्हि. एन्. जालगांवकर, श्री. कांबळे, डॉ. ए.ए. डडेमल ( प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र,रेपोली.) श्री. सुशिल देसाई, विजय खांबरे, संग्राम वाखचुरे ( बायर क्रॉपसायनस प्रा. लि. ठाणे ) तसेच बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. व्ही. एन्. जालगांवकर (किटकशास्त्रज्ञ) व डॉ. ए. ए. डडेमल ( प्रभारी अधिकारी , कृषिविभाग) यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here