जुनी पेन्शन लागू करा ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी माणगावात बाईक रॅली काढून शासनाचे वेधले लक्ष

जुनी पेन्शन लागू करा !

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी माणगावात बाईक रॅली काढून शासनाचे वेधले लक्ष

जुनी पेन्शन लागू करा ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी माणगावात बाईक रॅली काढून शासनाचे वेधले लक्ष

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
मो, 9271723603

सर्वाना जुनी पेन्शन मंजूर करण्याबाबत केंद्र व राज्य शासन गंभीर नाही. केंद्र सरकाने पीएफआरडीए कायदा मंजूर केला आहे. नविन अंशदायी पेन्शन योजना अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता देश पातळीवर विविध आंदोलने उभारण्यात आली. राज्य शासनाकडे ही योजनाच बंद करून जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वाना लागू करा या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, रायगड जिल्हा माणगाव शाखेने ता. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता माणगाव जुने पंचायत समिती आवारात जमून माणगाव तहसील कार्यालयात बाईक रॅली काढून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी निवासी नायब तहसीलदार बी.वाय.भाबड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, रायगड जिल्हा माणगाव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खाडे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महाराष्ट्र माणगाव शाखा सरचिटणीस तुषार सुर्वे, सहचिटणीस संजय चव्हाण, सुरेश पालकर, इंदापूर मंडळ अधिकारी श्री. गडदे, खजिनदार बुद्धकोश पवार, श्रीम. माधुरी उभारे, श्रीम. तेटगुरे यावेळी आरोग्य, महसूल, वन विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here