माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे संबोधी विहार समितीची कार्यकारणी जाहीर !

माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे संबोधी विहार समितीची कार्यकारणी जाहीर !

माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे संबोधी विहार समितीची कार्यकारणी जाहीर !

✍ संतोष मोरे✍
इंदापूर विभाग प्रतिनिधी
📞77448 12027📞

इंदापूर :-संबोधी विहार समितीची संन.२०२२ ते २०२५ कालावधीची नव्याने निवडणुका घेऊन संचालक मंडळ व कमिटी नेमण्यात आली.
इंदापूर विभागामध्ये संबोधी विहार समिती २६ गाव ग्रुप इंदापूर विभाग नावाने बौद्ध समाजाची एक मात्र मातृ संस्था कार्यरत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रम साजरे केले जातात. प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. सुंदर असे भव्यदिव्य बुद्ध विहार निर्माण केलं आहे. ऐतिहासिक महाड चवदार तळ्याकडे जाणारे भीम आनुयायी ह्या इंदापूर जवळ असलेल्या संबोधी विहार येथे भेट देतात.अशा ह्या सुंदर संबोधी विहारची नवीन कार्यकारणी, संचालक मंडळ लोकशाही मार्गाने दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुका घेऊन जाहीर करण्यात आली. त्यामध्ये १६ संचालक निवडून आले. पुढे दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी. ७ कमिटीचे पदाधिकारी नेमण्यात आले. संस्थेचे सर्वात महत्वाचे सभापती हे मनाचे पद इंदापुर विभागाचे सामाजिक कार्यकर्ते मा. नामदेवजी राव यांना बहुमताने देण्यात आले . उपसभापती: मोतीराम शिर्के, कार्याध्यक्ष: लक्ष्मन गवाणे, उपकार्याध्यक्ष: भीमराज सकपाळ, मुख्यसचिव: सयाजी मोरे, सचिव: शुक्रदास मोरे, खजिनदार: अनंत मोरे संचालक म्हणून कृष्णा राव, प्रकाश कासे, राजेश सकपाळ, मनोहर गवाणे, भोळीनाथ साळवी, संतोष मोरे, किरण मोरे, अनंत कानाडे, राहुल गवाणे या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार आदरणीय डॉ. संजयजी सोनावणे (लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संथापक/अध्यक्ष उद्योजक तसेच एस आर एस ग्रुपचे चेरमन यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ.संजय सोनावणे साहेबाने पुढील वाटचालीस सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ही दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here