ललित सदाफळे या होतकरू युवकाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची आर्थिक मदत
वैद्यकीय उपचाराकरिता दहा हजार सातशे रुपयाची केली मदत.
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*
*राजुरा* कोणाच्या नशिबात नियतीने नेमके काय लिहून ठेवले आहे हे काही सांगता येत नाही. भविष्यातील स्वप्ने उराशी बांधून ललित सदाफळे या होतकरू युवकाने बेंगलोर येथील एका कंपनीत हॉटेल मॅनेजमेंटच्या संदर्भात नोकरीकरिता मुलाखत दिली. ललित ची या कंपनीमध्ये निवडही झाली. परंतु नियतीने घात केला आणी नोकरीवर रुजू होण्याच्या एक दिवस अगोदरच बल्लारपूर बामणी फाट्यावर आपल्या आजीला भेटून येत असताना ललित च्या दुचाकीला चारचाकी भरधाव वाहनाने धडक दिली व या अपघातात ललित ला आपला एक पाय गमवावा लागला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आठ दिवसात दोन शस्त्रक्रिया करून ललित चा जीव वाचवण्यात कुटुंबियांना यश आले मात्र एक पाय निकामी झाल्याने त्याला कृत्रिम पाय बसाविण्यासाठी कुटुंबियांची धावपळ सुरु झाली.
ललित कांतिकिरण सदाफळे
, रेल्वे वार्ड, लक्ष्मी लॉज जवळ, बल्लारपूर. येथे राहतो. ललित ला आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या पदाधिकाऱ्यांनी त्याला दहा हजार सातशे रुपयांची आर्थिक मदत केली. ललित ला कृत्रिम पाय लावण्यात येणार असून तो लवकरच आपल्या पायावर उभा होईल अशी सदिच्छा नेफडो संस्थेच्या वतीने देण्यात आली. अपघातात आपला एक पाय गमावलेल्या ललित ने हिंमत न हारता पुन्हा एकदा नव्या उमेदीने नोकरीकरिता मुलाखाती द्यायला सुरुवात केली असून ललित च्या व त्याच्या कुटुंबियांच्या या सकारात्मक कार्याला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने सुद्धा साथ दिली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, नागपूर विभागीय अध्यक्ष विजय जांभूळकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर, सुनीता उगदे, सुनैना तांबेकर, सर्वानंद वाघमारे, विलास कुंदोजवार, आकाश वाटेकर , ललित चे आई वडील आदींची उपस्थिती होती. स्वरूपा झंवर, स्वाती देशपांडे, माणिक उपलंचीवार, अल्का सदावर्ते, दिलीप सदावर्ते, नरेंद्र देशकर, कृतिका सोनटक्के, मंगेश सोनुले, सुरेश गिरडकर, रजनी शर्मा, प्रतिभा भावे, प्रदीप भावे, अमृता धोटे, मोहनदास मेश्राम, वज्रमाला बोलमवार आदींनी आर्थिक मदतीकरिता सहकार्य केले.