हिवाळी अधिवेशन नागपुर येथे भारतीय लोकसत्ताक संघटना व भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्यावतीने धरणे निदर्शने

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

नागपुर: महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो शासकीय प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शाळांमध्ये सर्व सामान्य वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारांचे हनन होणार आहे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. परंतु शाळा बंद करून शासन विद्यार्थ्यांच्या अधिकारांची पायमल्ली करीत आहे. या शासनाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात व सदर विषया बाबत शासना पर्यंत मागण्या पोहचविण्यासाठी संघटनेच्या वतीने यशवंत स्टेडियम, नागपूर येथे दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता. धरणे निदर्शने करण्यात आले.

आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचा सृजशील नागरीक व देशाचे भविष्य आहे. परंतु शासन विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय करीत आहे. शिक्षण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे. शासकीय शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. तसेच संघटनेच्या पुढील महत्वपूर्ण मागण्या मान्य करण्यात याव्यात.

……..………………………………

१) २० पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा, तसे परिपत्रक काढावे.   

२) शिक्षणाचा बजेट हा एकूण बजेटच्या २० टक्के करण्यात यावा. 

३) जिल्हा परिषदेच्या शाळा व इतर शासकीय शाळा या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या असाव्यात, राज्य बोर्डा बरोबरच CBSC व इतर बोर्डाचे शिक्षण जिल्हापरिषद व इतर शासकीय शाळामधून सुरू करावे. 

४) नवीन शिक्षण धोरण (सन २०२० चे शिक्षण धोरण) सरकारणे मागे घ्यावे, सदर धोरणाची अमलबजावणी करण्यात येऊ नये. 

५)Kg to pg पर्यंतचे शिक्षण हे मोफत ,सक्तीचे आणि एक समान दर्जेदार दर्जाचे शासनाने उपलब्ध करून द्यावे.

६)शासनाच्या सर्व शाळांचा दर्जा सुधारून एकसमान व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा शासनाने उपलब्ध करून द्याव्यात.

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काचा विचार करून सरकारने घेतलेला चुकीचे निर्णय मागे घ्यावेत…. 

शिक्षण आमचा अधिकार बंद करा त्याचा व्यापार

भारतीय_लोकसत्ताक_संघटना आणि भारतीय_लोकसत्ताक_विद्यार्थी_संघाच्या वतीने घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी शैक्षणिक भूमिका व मते आप-आपली व्यक्त करून बहुसंख्येने कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये निदर्शने करण्यात आले.

या निदर्शनास उपस्थित सामाजिक कार्यकर्ते ऍड.अमोलकुमार बोधिराज,दिपिका आग्रे,संतोष (सनी) कांबळे,मनिष जाधव, मंगेश खरात,किरण गमरे, पिलाजी कांबळे,वैशाली कदम,ऍड.रुपाली खळे-बोले,प्रा.किरण बोले, नितीन सातपुते, अश्विनी पवडमन,अंकिता मोरे,अतुल मोहिते,योगेश कांबळे, प्रविण कदम,पिंकी कांबळे आदी.कार्यकर्त्यांनी धरणे निदर्शने सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here