ब्रिटीशानी भगतसिंगांची कोणती मागणी अमान्य केली होती?

२३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी क्रांतिकारी शाहिद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरूशरीराला मारले होते, परंतु त्यांचे विचार शतकोनुशतके अजरामर राहणार आहेत

ब्रिटीशानी भगतसिंगांची कोणती मागणी अमान्य केली होती?

मनोज कांबळे
२३ मार्च, मुंबई: शहीद भगतसिंग यांना सुखदेव, राजगुरू यांच्यासह ब्रिटिश अधिकारी सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली २३ मार्च, १९३१ रोजी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या अगोदर शाहिद सिंग यांनी ब्रिटीश प्रशासनाकडे पेटिशन दाखल करून एक मागणी केली होती. परंतु जुलुमी ब्रिटिश सत्तेने ती मागणी धुडकावून लावली.

पंजाब गव्हर्नरला लिहिलेल्या पेटिशनमध्ये भगत सिंग म्हणतात कि, ७ ऑक्टोबर १९३० रोजी न्यायालयाकडून आम्हाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यावेळी लाहोरचा कट रचल्याबद्दल आणि इंग्लंडचा राजा किंग जॉर्ज याच्याविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप आमच्यावर ठेवण्यात आला होता. आपण निर्णय देताना दिलेल्या माहितीनुसार दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे भारतीय आणि ब्रिटिश शासक यांच्यामध्ये युद्ध सुरु असून आम्ही त्या युद्धात सहभागी झालेले एक सैनिक आहोत.
मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कि युद्ध सुरूच आहे आणि ते असेच सुरु राहील. जोपर्यंत सामान्य भारतीय जनतेची आणि त्यांच्या संपत्तीची लूटमार परकीय ब्रिटिश सत्तेकडून, किंवा काही जुलुमी भारतीयांकडून सुरु राहील, तोपर्यंत युद्ध सुरु राहील. हे युद्ध आमच्यापासून सुरु झाले नव्हते आणि ना ही ते आम्हाला मारून टाकल्यानंतर संपणार आहे.

तुम्ही आम्हाला फाशीची शिक्षा दिली आहे आणि ती तुम्ही तुमच्या ताकदीच्या जोरावर नक्की पूर्ण करणार. पण त्याआधी मी तुम्हला सांगू इच्छितो कि, तुमच्या कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आम्ही ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले आहे आणि त्यामुळे आम्ही एक युद्धबंदी सैनिक आहोत. त्यामुळे आम्हाला तशीच वागणूक मिळावी हि अपेक्षा. फाशी देण्याऐवजी सैनिकांसारखे गोळी मारून आम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.

शाहिद भगत सिंगांची हि मागणी तत्कालीन पंजाब गव्हर्नरने धुडकावून लावली. आम्हाला एखाद्या गुन्हेगारासारखे फासावर लटकवून नव्हे तर गोळी मारून सैनिकांसारखे मरण द्यावे, हि भगत सिंगाची मागणी ब्रिटीश सत्तेने साफ नाकारली. इतकेच नव्हे तर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या नियोजित वेळेच्या आधीच फासावर लटकवले आणि त्यानंतर तब्बल तासभर त्यांचा मृतदेह त्याच अवस्थेत लटकवून ठेवला.

 

हे आपण वाचलंत का?

 

आज कित्येक दशकानंतरही शाहिद भागात सिंग यांचे शब्द मात्र तितकेच खरे ठरतात. आजही अन्यायाविरुद्ध लढताना भारतीय नागरिक शाहिद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्याकडूनच प्रेरणा घेतात. २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी त्यांच्या शरीराला मारले होते, परंतु त्यांचे विचार शतकोनुशतके अजरामर राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here