माणगांव रेल्वे स्थानकात काही गाडयांना थांबा देण्याबाबत कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगांव तर्फे निवेदन पत्रक.....

माणगांव रेल्वे स्थानकात काही गाडयांना थांबा देण्याबाबत कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगांव तर्फे निवेदन पत्रक…..

माणगांव रेल्वे स्थानकात काही गाडयांना थांबा देण्याबाबत कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगांव तर्फे निवेदन पत्रक.....

✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-दक्षिण रायगड मधील माणगांव, महाड,श्रीवर्धन, पोलादपूर,तला, म्हसळा या तालुक्यातील असंख्य नागरिक नोकरी धंद्या निमित्ताने मुंबई,ठाणे कल्याण, वसई,विरार,पालघर सुरत, अशा महामुंबई लगत वास्त्यव्यास राहायला आहेत यांना गावासाठी येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. दक्षिण रायगड जिल्हा मधील माणगांव रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिकांना याचा मोठया प्रमाणे त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई गोवा महामार्ग हा खडतर व खर्चिक आणि वेळखावू असल्यामुळे मोठया संख्येने प्रवाशी याना रेल्वे प्रवाशाला प्रथम पसंती असते तसेच माणगांव तालुका मुंबई पासून जवळ असल्यामुळे प्रवाश्याचा मुंबई ते गावी ये जा वारंवार होत असतो परंतु माणगांव स्थानकात प्रवाशी सख्येत तितक्या गाड्या उपलब्ध नाही आहेत. आता रोहा वीर दुहेरी पूर्णपणे झाल्यामुळे मुंबई ते वीर दरम्यान पुढील काही मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशा मागण्या कुणबी युवा मंच माणगांव तर्फे निवेदन पत्रक नुसार स्थानकात दिले आहेत अशी दखल रेल्वे प्रशासन यांनी घ्यावी असे बोलण्यात आले आहे.

माणगांव रेल्वे स्थानकात कोणकोणत्या गाडयाचा थांबा निश्चित हवा आहे त्याच निवेदन पुढील प्रमाणे.२०१११/२९११२ छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनल मंडगाव कोकणकण्या एक्सप्रेस १२०५१/१२०५२ छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनल मंडगाव जणसताब्दी एक्सप्रेस, १६३४५/१६३४६ लोकमान्य टिळक ट्रमिनल त्रिवेदरम नेत्रावती एक्सप्रेस,१११००मंडगाव लोकमान्य टिळक एक्सप्रेस,१९५७७/१९५७८ जामनगर तिरुनवेळी एक्सप्रेस,२०९०९/२०९१० भावनगर कोचेवली एक्सप्रेस, लोकमान्य टिळक व इतर गाडयांना माणगांव रेल्वे स्थानकात थांबा देणे बाबत तसेच मुंबई माणगांव वीर मेमो गाडी चालू करणे बाबत,५०१०३/५०१०४ दादर रत्नागिरी गाडी पूर्वी प्रमाणे चालू करणे त्याच प्रमाणे एक्सप्रेस गाड्यामधील माणगांव स्थानकातील आसन सीट आरक्षण कोटा वाढवणे बाबत निवेदन पत्रक मा. श्री.अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री भारत सरकार, मा. श्री. रावसाहेब दानवे रेल्वे राज्य मंत्री भारत सरकार, मा. श्री. अमित कुमार लाहोटी चेअरमन रेल्वे बोर्ड, मा.श्री. नरेश लालवणी महाव्यवस्थापक रेल्वे बोर्ड, व मा. श्री. संजय गुप्ता अध्यक्ष व्यवस्थापकीय कोकण रेल्वे कॉपीरिसन लिमिटेड यांना कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगांव अध्यक्ष ज्ञानेश्वर खराडे,सत्यजित भोनकर सचिव,नारायण शिंदे खजिनदार, सुनिल भोस्तेकर कार्याध्यक्ष,दत्तगुरु उभारे उपाध्यक्ष,सुभाष भोस्तेकर उपाध्यक्ष,सुनिल माटल उपाध्यक्ष,श्रीकांत इंदुलकर उपाध्यक्ष आदी मान्यवरच्या हस्ते निवेदन पत्रक दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here