भारतीय नौदलाचा मीलन २०२२ युद्धसराव विशाखापट्टणम येथे सुरु

मीलन- २२ च्या या युद्धाभ्यासात आजवरचा सर्वात जास्त ४० पेक्षा जास्त देशांच्या युद्ध नौका आणि उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळांचा सहभाग

भारतीय नौदलाचा मीलन २०२२ युद्धसराव विशाखापट्टणम येथे सुरु

मीडियावार्ता न्यूज
२४ फेब्रुवारी, मुंबई: मीलन (MILAN) हा भारतीय नौदलाने 1995 साली अंदमान आणि निकोबर तळावर सुरु केलेला एक द्वैवार्षिक बहुराष्ट्रीय नौदल युद्धाभ्यास असून, 2001,2005, 2016 आणि 2020 साल वगळता दर दोन वर्षांनी हा युद्धाभ्यास झालेला आहे. 2001 आणि 2016 च्या आवृत्ती आंतरराष्ट्रीय ताफा आढाव्यामुळे तर 2005 सालचा युद्धाभ्यास 2006 साली झाला तर 2004 सालचा अभ्यास त्सुनामीमुळे रद्द करण्यात आला होता.  2020 चा युद्धाभ्यास कोविड मुळे 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.

सुरुवातीला म्हणजे, 1995 साली केवळ चार देश -इंडोनेशिया, सिंगापूर, श्री लंका आणि थायलंड या युद्धसरावात सहभागी झाले होते. मात्र, त्यानंतर, यातळे सहभागी देश आणि युद्धाभ्यासात गुंतागुंतीच्या कवायती वाढतच गेल्या. भारताच्या पूर्वेकडे पहा, या धोरणाला अनुसरून, सुरु झालेल्या मीलन या युद्धसरावाला सुरुवात झाली. प्रदेशात सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी (सागर) या उपक्रमाअंतर्गत, पश्चिम आयओयर  किनारी आयओआर या बेटांवरील राष्ट्रांना यात सहभागी करुन घेतले गेले. यात 2014 पासून सहा प्रादेशिक देशांपासून 18 देशांपर्यंत हा सहभाग वाढला.

 

हे आपण वाचलंत का?

 

भारतीय नौदलाने परदेशी मित्रराष्ट्रांसोबतची मैत्री गेल्या दशकभरात अधिकच विस्तारली, त्यानंतर नौदल सहकार्य अधिकच वाढवण्याची गरज वाटायला लागली. त्यासाठी मीलन ची व्याप्ती आणि गुंतगुंतीच्या कवायती, प्रादेशिक आणि  जगातील बिगर प्रादेशिक नौदल युद्धसरावात सहभागी होण्याची आवश्यकता वाटू लागली. व्यापक नौदल सरावासाठी पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेता, हा युद्धसराव, मुख्यभूमीपासून, विशाखापट्टणम इथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण विशाखापट्टणम पूर्व नौदल विभागाचे मुख्यालय इथे आहे.

मीलन 2022 युद्धसराव

मीलन- 22 च्या या युद्धाभ्यासात आजवरचा सर्वात जास्त 40 पेक्षा जास्त देशांच्या युद्ध नौका आणि उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळांचा सहभाग बघायला मिळेल. या वेळचे मिलन हे ‘व्याप्ती आणि गुंतागुंत’ या बाबतीत मोठे असेल, ज्यात समुद्रातील सराव, समुद्रावरचे आणि आकाशातील कारवाया आणि शस्त्र चालविणे याचा समावेश असेल. कार्यान्वयनावरील परिषदा सुद्धा घेतल्या जातील, जेथे यात सहभागी होणाऱ्या नौदल अधिकारी/प्रतिनिधींना सामुद्रिक सुरक्षेवर त्यांची मते मांडण्याची संधी मिळेल. उच्चस्तरीय परदेशी प्रतिनिधींमध्ये सर्वोच्च नौदल सेनानी, संस्थांचे प्रमुख, राजदूत आणि त्यांचे समकक्ष यांचा समावेश असेल.

https://www.instagram.com/p/CaRe-ItF2dF/

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडलेल्या घटनांचा वृत्तांत पाहण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here