छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा बोध घेऊन विद्यार्थ्यांनी आपले जीवन स्पर्धा परिक्षातून घडवावे.पोलीस निरिक्षक राजु मेंढे
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-तालूक्यातील मिडांळा येथे महात्मा फुले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक राजू मेढे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नागभीड तर अध्यक्ष अमर अशोकजी खंडाळे सचिव महात्मा फुले मागासवर्गीय मंडळ मींडाळा, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. बी. एम. कऱ्हाडे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय मगर प्रसिद्ध सामाजिक विचारवंत, दुर्वेकांत बनकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोंड, प्रमुख अतिथी म्हणून मा. फुकट सर पर्यवेक्षक संत हरदास विद्यालय मींडाळा, प्रभुजी कऱ्हाडे हे विचार मंचावर उपस्थित होते.
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन आणि पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटक राजू मेढे पोलीस निरीक्षक नागभीड यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि संस्थेचे शिल्पकार दिवंगत अशोकजी खंडाळे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मान्यवरांचे स्वागत बी. ए. भाग एक च्या विध्यार्थीनी सोनाली गायकवाड, सोनाली जेंगठे, प्राजक्ता मोहूर्ले, भाग्यश्री राऊत, करिष्मा चौधरी यांनी स्वागत गीत सादर करून व पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नितेश नवघडे यांनी केले. उद्घाटकीय भाषणात राजू मेढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवित असताना शिवाजी महाराज यांच्या कार्यातून बोध घेऊन आपले जीवन स्पर्धा परीक्षातून घडवावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. कऱ्हाडे सर यांनी समाजाला शिवाजी महाराजांच्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे हे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर प्रा. संजय मगर सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक लढाया जिंकल्या. त्यांच्या शौर्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. त्याचप्रमाणे दुर्वेकांत बनकर सर यांनीसुद्धा मार्गदर्शन करताना म्हटले की, शिवाजी महाराजांसारखा कार्यकारणभाव सांगणारा राजा जगाच्या पाठीवर अजून पर्यंत निर्माण झाला नाही. त्यानंतर फुकट सर यांनीसुद्धा शिवरायांची आईच त्यांची खरी गुरु होती असे सांगितले तर प्रभुजी कऱ्हाडे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणामध्ये अमर खंडाळे सर, सचिव महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय मंडळ, मींडाळा यांनी मार्गदर्शन करताना, शिवाजी महाराजांची नुसती जयंती साजरी करून उपयोग होणार नाही तर त्यांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारणे ही काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. रमेश मेश्राम सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. अशोक शिंगाडे, प्रा. निलेश टेंभुरने, प्रा. महेंद्र बोरकर, प्रा.विद्या तरारे, प्रा. अपर्णा नैताम तसेच शिक्षकेतर कर्मचारी अमोलजी खडसे, पुरुषोत्तमजी नंदेश्वर, अक्षय बनकर, राहुल वरोकर, जगदीश मून, जितू बोदेले, प्रवीण बागडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली गायकवाड हिने तर आभार भारती लिंगायत हिने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.