फुकटा शिवारातील शेतातील फार्महाऊसचे शेटर तोडून अज्ञात चोरट्यानी पळविले २६ तुरीचे पोते

अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047249
हिंगणघाट : – हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा वडणेर मार्गावरील फुकटा शिवारातील शेतातील फार्महाऊसचे शेटर तोडून २१ मार्चच्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यानी तुरी भरून असलेल्या २६ पोते पोत्यांची चोरुन नेल्याची घटना आज मंगळवारी २२ मार्च रोजी उघडकीस आली असून यासंबंधी शेतकऱ्यांने वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुकटा येथील शेतकरी खेमराज बोरेकर यांचे आजनसरा वडणेर मार्गावरील फुकटा शेतशिवारात शेत असून शेतात बैल व शेतीचे साहित्य व शेतमाल ठेवण्यासाठी फार्महाऊस बांधलेला आहे.या फार्महाऊस मध्ये त्यांनी तुरीचे पोते भरुन ठेवले होते. 21 मार्च च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मध्यरात्री शेतातील फार्म हाऊस चे शटर तोडून त्यामधील २६ तुरीचे पोते लंपास केले. शेतकरी बोरेकर यांनी वडनेर पोलीस ठाणे गाठून चोरीच्या गुन्ह्याची तक्रार दिली याबाबतचा पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे बिट जमादार प्रशांत वैद्य यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.








