*मुसळधार पाउस दुचाकी आणी महिलेची प्रसूती.*

यवतमाळ:- जिल्हातील मुरझडी येथील राहवासी महीलेला आठ महिने पूर्ण झाल्याने गर्भवतीने सोनोग्राफी केली. त्यात गर्भ मृत असल्याचे समजताच ती सुन्न झाली. काय कराव सुचण्याच्या आत ती आणी बरोबर असलेले त्यांचे सासरे दुचाकीवरून खासगी रुग्णालयात जात असतानाच प्रसवकळा सुरू झाल्या. त्यात धुवाधार पाऊस. यात रस्त्यावरच प्रसूती झाली अन् तो मृत गर्भ कधी बाहेर पडला हे समजलेच नाही. ही मन सुन्न करणारी घटना यवतमाळ शहरातील भोसा नाका परिसरात घडली. मृत अर्भक सापडल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी शोध घेतला असता हे भयान वास्तव पुढे आले.
मुरझडी येथील एक गर्भवती महिला मंगळवारी सकाळी आपल्या सासऱ्यासोबत यवतमाळला आली. दत्त चौकातील सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी केली. गर्भ मृत असल्याचे सांगून तिला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सासरा आणि सून दोघेही दूचाकीवरून खासगी रुग्णालयाकडे रवाना झाले.
मात्र, दुचाकीवरच अवघडलेल्या अवस्थेत तिचा प्रसवकळा सुरू झाल्या. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. सासऱ्याला सांगण्याच्या आतच गर्भ खाली पडला. त्यानंतर काही वेळातच महिला बेशुद्ध झाली.
पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर देखील कोणीच नव्हेत. पाऊस थांबताच मृतावस्थेतील अर्भक पाहून खळबळ उडाली. शहरातील भोसा नाका परिसरात मंगळवारी भरस्त्यावर मृत अर्भक सापडले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती मिळताच अवधूतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच घटनेचा छडा लावला. त्यानंतर हे भयान वास्तव समोर आले. अर्भक कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुरझोडीत त्या मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here