*वेश्याव्यवसाय करणे गुन्हा ठरत नाही ;मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा, तीन महिलांची सुटका*

*मुंबई* -महिला वसतिगृहात ताब्यात ठेवण्यात आलेल्या देहविक्री करणाऱ्या तीन महिलांची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली.

कायद्यातंर्गत वेश्याव्यवसाय करणे गुन्हा ठरत नाही. प्रौढ महिला तिच्या मर्जीने व्यवसाय निवडू शकते, तो तिचा अधिकार आहे. तिच्या संमतीशिवाय तिला ताब्यात ठेवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने देहविक्री करणाऱ्या तीन महिलांची सुटका केली.

“देहविक्री बंद करणे हा पीआयटीए १९५६ कायद्याचा उद्देश नाही. देहविक्रीला गुन्हा ठरवणारे किंवा एखादी व्यक्ती देहविक्रीत गुंतली असेल तर, तिला शिक्षा देण्यासाठी कायद्यात तरतूद नाही” असे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here