Home latest News शैक्षणिक फुलोरा क्षमता विकसन प्रकल्प कौतुकास्पद : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे ...

शैक्षणिक फुलोरा क्षमता विकसन प्रकल्प कौतुकास्पद : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे गोगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट

71

शैक्षणिक फुलोरा क्षमता विकसन प्रकल्प कौतुकास्पद : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे

गोगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट

शैक्षणिक फुलोरा क्षमता विकसन प्रकल्प कौतुकास्पद : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे गोगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट
शैक्षणिक फुलोरा क्षमता विकसन प्रकल्प कौतुकास्पद : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे
गोगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

गडचिरोली : -विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी गोगांव येथील फुलोरा क्षमता विकसन बालभवन प्रकल्प असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शोळेला भेट दिली. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह विविध नाविण्यपुर्ण स्थानिक साहित्यामधून मुलांना शिक्षण दिले जाते त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. सद्या कोरोना संसर्गामूळे विद्यार्थी शाळेत नव्हते. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले विविध उपक्रम त्यांनी आयुक्तांना सादर केले. यावेळी आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी शिक्षण तेथील पद्धतीचे कौतुक केले व उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. मुलांसाठी हसत खेळत मनोरंजनातून वेगवेगळया टुल्सचा वापर करून चांगले शिक्षण देण्याचे कार्य या शाळेतून होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव, पंचायत समिती गडचिरोली येथे फुलोरा क्षमता विकसित प्रकल्पाच्या संदर्भाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डायट गडचिरोली येथील प्राचार्य शरदचंद्र पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनीत मत्ते , शिक्षणाधिकारी प्राथमिक हेमलता परसा यांनी भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून फुलोरा क्षमता विकसित प्रकल्प जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव या ठिकाणी सुरु आहे. या प्रकल्पाची पार्श्वभूमी, सादरीकरण, साहित्य निर्मिती व इतर माहिती भेटी दरम्यान देण्यात आली. तद्वतच शाळेतील वर्चुअल क्लासरूमला सुद्धा मान्यवरांनी भेट दिली. वर्चुअल क्लासरूमचे सादरीकरण करण्यात आले. सदर सादरीकरण शाळेतील शिक्षिका सुरेखा हलामी, शालू मेटे, व वनश्री जाधव यांनी केले. फुलोरा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये झालेले सकारात्मक बदलाव सदर सादरीकरणात सांगण्यात आले. याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी यु. एन. राऊत, केंद्रप्रमुख बंडू खोबरागडे, शाळेचे मुख्याध्यापिका उज्वला खोबरागडे, शाळेतील शिक्षक वृंद, विषय सहायक डॉ. विजय रामटेके, कुणाल कोवे व विठ्ठल होंडे उपस्थित होते. सदर भेटीदरम्यान तांत्रिक सहकार्य श्री तपण सरकार विषय सहाय्यक यांनी केले.