ख्रिस्ताचा संदेश आणि मानवी व्यवहार

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

२५ डिसेंबर: आम्ही जगतो.धडपडतो.सुखानं जगण्यासाठी धडपडतो.पण खरंच सुख मिळते का आपल्याला?असा जर विचार केला तर त्याचं उत्तर सुख मिळतं असं आहे.पण आम्हाला सुख मिळत असलं तरी आम्ही समाधानी नाही.म्हणुन आम्ही दुःखी होतो.

मुळात येशू ख्रिस्ताने सांगितले की प्रार्थना अशी करा की तुमच्या प्रार्थनेने जग सुखी व्हावं.त्याचबरोबर माझंही.बायबल हा ख्रिस्तांचा पवित्र ग्रंथ.त्यात सुखाचा मार्ग सांगतांना ‘मी दुःखी असलो तरी चालेल,पण परमेश्वरा तु इतरांना सुखी ठेव.जेव्हा इहरत्र मंडळी सुखी होतील.तेव्हा आपोआपच आम्हाला सुख प्राप्त होईल.’ खरं आहे त्यांचं म्हणणं.

येशु मसीहा ज्या काळात होवुन दिला,तो काळ अत्यंत धामधुमीचा होता.मेरी गरोदर राहिली.पण तिचं लग्न झालं नव्हतं.ती गरोदर असतांनाच जुन्या गावी रहिवासी दाखला मिळविण्यासाठी जात असतांना अचानक मेरीला प्रसवकळा येवुन गव्हाणीत येशुचा जन्म झाला.पण जन्मतांना आणि जन्म झाल्यानंतरही येशुला सुख मिळाले नाही.तो देवाचा पुत्र आहे ही आकाशवाणी ही झाल्याचे मेंढपाळांनी जेव्हा ऐकलं आणि हा देवाचा पुत्र खरंच कोणत्या ठिकाणी जन्मला हे आकाशवाणी नुसार पडताळून पाहण्यासाठी ते सरसावले असता तो त्या आकाशवाणी नुसार बरोबर तिथेच सापडला.ज्या ठिकाणचा उल्लेख आकाशवाणीत होता.

आम्ही आजच्या वैज्ञानिक युगात आकाशवाणीला मानत नसलो तरी एक गोष्ट नक्की की ह्या महामानवाने जगाच्या उद्धारासाठी जो त्याग केला,तो वाखाणण्याजोगा आहे.त्यांच्याबद्दल बायबल चरित्रात चमत्कार दाखवले आहेत.

 लोकांनी येशुला एवढा त्रास दिला तरी शेवटच्या क्षणाला म्हणजे ज्यावेळी यहुद्यांनी त्याला पकडून त्याला क्रुसावर चढवले.तसेच त्याच्या हाता पायाला खिळे ठोकले.तेव्हा अंतिम समयी येशु म्हणतात की हे प्रभो,हे लोकं का करीत आहेत.ते यांना माहीत नाही.पण तरीही तु त्यांच्या दुष्कृत्याबाबत त्यांना माफ कर.अर्थात शत्रुंनाही माफ करुन टाकण्याचा अनमोल संदेश येशुने जगाला दिला.अर्थात अहिंसेचा संदेश या प्रभु येशुने जगाला दिला.कदाचिच अहिंसा पाळल्यानेच शांती आणि समाधान लाभते असं त्यांचं म्हणणं होतं.

 आज आपण काय करतो.पंचवीस डीसेंबर मनवतो.तो मनवीत असतांना कोणी कोणी मांसावरही ताव मारतात.शेकडो प्राण्यांची हत्या होते यात.निष्पाप जीवांचे बळी घेतले जातात.मृत्यू आला तरी खोटे बोलायचे नाही हा संदेश देवुनही आम्ही पदोपदी खोटेही बोलतो.चोरी डकैती करणा-या दोन लोकांना त्याच्या बाजुलाच क्रृसावर चढवलेले होते. त्यामुळे चोरी डकैती करु नका.मर्यादा पाळा हे देखील प्रभू येशु सांगुन गेले.आम्ही ह्या चांगल्या गोष्टी लक्षातच घेत नाही.करतही नाही.

  जगातल्या प्रत्येक धर्माने आपल्याला सत्य,अहिंसा,अस्तेय,अपरिग्रह आणि चागल्या संस्काराची देणगी दिली.पण शत्रुलाही माफ करुन टाका.त्याने खरं तर शत्रुत्व संपेल हे कोणत्याही धर्माने सांगीतलेले नाही.ते या येशुने सांगितले.ह्या एका बीरुदामुळे हा धर्म श्रेष्ठ ठरला.

 आज आपण पाहातो की हल्ली पितापुत्रात,भावाबहिणीत,शत्रुत्व एवढं विकोपाला गेलं आहे की ह्या शत्रुत्वामुळे आम्ही एकमेकांचा काटा काढण्याचा प्रयत्न करतोय.हा काटा काढत असतांना त्याला माफ करण्याऐवजी त्याचं किती वाईट करता येईल असाच प्रयत्न सातत्याने करीत असतो.मानवी व्यवहार आज आम्ही बिघडवुन टाकलेला आहे.माणुसकीची तर हत्याच केली आहे आम्ही.त्यावेळीही हे हत्यासत्र होतच होतं.म्हणुनच ते तीन दिवसानंतर जीवंत होवुन स्वर्गात गेले.लोकं सुधरत नाही हे येशुलाही माहीत होतं.तरीही त्यांच्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं.सर्वांना माफ करुन टाकलं क्रुसावर चढल्यावर…….म्हणुनच याच बोलण्याचा असा परिणाम झाला यहुद्यांमध्ये की त्यांना वाटले की आम्ही एवढा सारा त्रास देवुनही हा माणुस आपण केलेल्या कृत्याबाबत देवाला प्रार्थना करतो की हे देवा,ही मंडळी बाळबोध आहेत.आपण काय करतो हे यांना माहीत नसल्याने ही मंडळी हे कृत्य करीत आहेत.तेव्हा तु त्यांना माफ कर.या वाक्याचा हा परिणाम झाला की त्यांनी पुढे जावुन त्यांचे शिषत्व पत्करले व त्यांच्या विचारांचा प्रसार केला.

आम्हाला येशु ख्रिस्त आणि त्यांचा धर्म आवडत नसला तरी चालेल.पण त्यांनी जगाला दिलेले तत्वज्ञान जोपासण्याची आज तरी गरज आहे.शत्रु कितीही विघातक कृत्य करो.त्याला माफ करण्याची ताकद आपल्यात निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.आम्ही आज रक्ताच्या नात्यातील मंडळी रक्ताचे नाते विसरुन आपापसात भांडतो ते काही बरे नाही.पैसा संपत्ती यासाठी आमचे भांडणे हेही बरोबर नाही.मरणानंतर काय मिळतं?पैसा,संपत्ती सारं इथंच राहातं.जी भांडणं करुन आम्ही ज्यांच्यासाठी पैसा कमवतो.तो स्वपुत्रही म्हातारपणात आपला होत नाही.तोही आपल्याला सोडून जातो ऐनवेळी.हेही लक्षात ठेवण्याची आज गरज आहे.

आज देशाात शितयुद्ध सुरु असल्याचे जाणवते.भारतावर पाकिस्तान आणि चीनची नजर आहे.तरीही भारत शांततेने वागतो.यामुळे एक फायदा हा होत आहे की जगात भारत जरी आक्रमक नसला तरी त्यांचे नाव आदराने घेतले जाते.याचे एकमेव कारण आपली शत्रुलाही माफ करण्याची ताकद.तीच ताकद अंतर्गत भागात रक्ताच्या नात्यात निर्माण होवू द्या.छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडण उकरुन काढू नका.त्यातच खरं यश आहे आणि प्रभू येशुंनीही आपल्याला हेच शिकवले आहे.खरंच मानवी व्यवहार कसा चालवावा ह्याचं ब्रीद प्रभू येशुच्या तत्वज्ञानात आहे.बस ते तत्वज्ञान अंगिकारण्याची तरी आज गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here