प्रजासत्ताक भारत, भेदक वास्तव्य आणि देशापुढिल आव्हाने..
प्रजासत्ताक भारत, भेदक वास्तव्य आणि देशापुढिल आव्हाने..

प्रजासत्ताक भारत, भेदक वास्तव्य आणि देशापुढिल आव्हाने..

प्रजासत्ताक भारत, भेदक वास्तव्य आणि देशापुढिल आव्हाने..
प्रजासत्ताक भारत, भेदक वास्तव्य आणि देशापुढिल आव्हाने..

प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348
प्रजासत्ताक दिन’ सर्वांच्या जीवनातील सोनियाचा दिवस. भारतीय संविधानाचा सुवर्णाक्षरांचा दिन. अनेक हुमात्माने जीवाच रान करुन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल. पण ते अबाधित ठेवण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निर्माण केलेल्या भारतिय संविधानाने केल. देशातील सर्वसामान्यांच्या उज्जल भवितव्याकडे बघणारी दुरदूष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ होती . म्हणूनच स्वतंत्र भारताची राज्य घटना लिहीताना भारताचा प्रदिर्घ इतिहास, चाली रिती, धर्म, पंथ, सर्वमान्य भावना व लहान थोरांसह सर्व घटकांचा विचार करून घटनेला जे रुप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले त्यामुळे आजही भारत एकाच सुत्रात बांधलेला आहे. जगात ठिकठिकाणी अनेक स्थित्यंतरे झालीत, मोठमोठी साम्राज्ये कोलमडलित, त्यांची अनेक शकले झालीत पण भारत देशाची संविधानाची चौकट भविष्याचा वेध घेऊन सामाजिक बांधीलकी आणी बुध्दीमत्तेच्या पायावर सुरक्षित आहे. आता तर जगातील अनेक देशासाठी आपल्या भारत देशाची राज्य घटना दिपस्तंभाचे काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले आपल्या भारत देशाचे संविधान म्हणजे लाखो करोडो सामान्य भारतीयांच्या मनाची स्पंदनं आहे. श्वास आहे. आपल्या देशात निर्भयपणे जगण्याचा विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना तुम्ही भारताला दिलीली बहूमोल देणगी समजुन. ती नेहमी अबाधीत राहील ही आजच्या व उधाच्या पिढीची जबाबदारी असुन त्याचे स्मरण ठेवणे हाच आज 73 प्रजासत्ताक दिनी आपल्याला आमच्या सर्व देशवासिया आदर असणार…

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जगातील अनेक देशाचे विघटन झाले. अनेक देश होत्याचे नव्हते झाले. अनेक देशाचे तुकडे झाले. अनेक देश हुकुमशाहीचा आराजकतेच्या वातावरणात गुम झाले. अनेक देश आतंकवादाचा पायावर स्वता:ची शौर्वभोमता ग्राहण ठेउन आपल्याच जनतेच्या जिवावर उठली असल्याचे समोर आले. अनेक देश आपल्याच लोकांच्या नरशहार करुन आपल्याच लोकांचे रक्तपात करुन जुल्मी सत्ता स्थापन करत सुटले आहे. काय होणार भविष्यात याचे भाकित कुणी सांगू शकणार नाही पण जो देश लोकशाही, जनतंत्र, लोकमत, न्याय, समता, अधिकार यांचे हनन करेल त्यावेळी त्यादेशात आराजकता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

प्रजासत्ताक भारत, भेदक वास्तव्य आणि देशापुढिल आव्हाने..
       देशाचे संविधान सुपूर्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

● भारताला भेडसावणारे भेदक वास्तव्य. ●
14 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र्य झाला. आणि 26 जानेवारी 1950 ला देश प्रजासत्ताक झाला. पण 1947 अगोदर या देशात नक्षलवाद नव्हता तो स्वतंत्र्य भारतात का निर्माण झाला त्याचे पण संशोधन आज करायला हवे. देशात आज मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहे. अन्नदात्याची आत्महत्या देशाला शरमेने मान खाली घालणारी घटना असते. आज देशात तरुण, तरुणी मोठ्या प्रमाणात बेरोजगार असल्याचे चित्र आहे. देशात हररोज होणारे महिला, मुलीवर अत्याचार बलात्कारचे प्रमाण विकोपाला गेल आहे. देशातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था तर पार नरकात गेल्या सारखी दिसत आहे. देशातील कामगारांची स्थिती तर फारच भयंकर आहे. देशात बाल विवाहाचे मोथे उत माजले आहे. ढोंगी, नराधम, बलात्कारी बाबा, संत, साधूनी तर देशाला पार पोकरल आहे. त्यात देशातील राजकारणी नेते मंडळीच तर विचारु नका अगदी मृतकाचा टाळूवरच लोणी खायच तरी त्यानी सोडल नाही. इतके सरड्याचे रंग त्यांनी दाखवले आहे.

● देशा पुढिल आव्हाने ●

समाजात द-या निर्माण करणार राजकारण हे आता नित्याचंच झाल आहे. जाती धर्माचे वाद लाऊन देशात अशांतीचे वातावरण तयार करत देशात सत्ता प्रप्तीचे स्वप्न आज प्रत्येक राजकिय नेते बगत आहे. हजारो वर्षा पासुन शिक्षण आणि विकासाच्या मार्गावरून बाहेर फेकल्या गेलेले आदिवासी यांनी एकत्र येउन व्रज मुठ बनवुन आपले अधिकार प्राप्त करावे लागेल. तरुणांना देशव्यापी चळवळ उभारून अंधमय राजकारण्याना धडा शिकवण्यासाठी कमर कसली पाहिजे. तरच सर्वाधीक युवा असलेल्या या भारतात समता, न्याय, बंधूता, लोकशाही यावर आधारलेला आपला भारत देश स्वातंत्र्य आणि विकासाच्या मार्गावरून समोर जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here