Home latest News निशुल्क साठ दिवसीय तांत्रिक विकास प्रशिक्षणाचे समारोप व प्रमाणपत्र वितरित 

निशुल्क साठ दिवसीय तांत्रिक विकास प्रशिक्षणाचे समारोप व प्रमाणपत्र वितरित 

30

निशुल्क साठ दिवसीय तांत्रिक विकास प्रशिक्षणाचे समारोप व प्रमाणपत्र वितरित 

 गोरेगाव: साठ दिवसीय क्लाऊड कम्प्युटिंग सर्विस अँड सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय फुलचूर पेठ येथे दिनांक 19 मे 2026 ला कार्यक्रमाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी बार्टीचे राज्य समन्वयक एच आर वाघमारे, यांनी मागासवर्गीयांसाठी ही सुवर्णसंधी असून ह्या संधीचे सोने करा असे लाभार्थ्यांना आवाहन केले.

याप्रसंगी बार्टी चे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले,रोशन तायवाडे प्रकल्प अधिकारी, जिल्हा उद्योग विकास केंद्राचे वैभव टाकळे गडचिरोली प्रकल्प समन्वयक शिशुपाल मानकर, चंद्रशेखर मेश्राम मार्गदर्शक अतिथी म्हणून उपस्थित होते.