पोलादपूर तालुक्यातील चांढवे बुद्रुक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

8080092301

रायगड :-पोलादपूर महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा रायगड अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र महाड यांच्या माध्यमातून, प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव यांच्यामार्फत महिला बचतगटातील महिलांकरिता पोलादपूर तालुक्यातील चांढवे बुद्रुक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.

        या शिबिराकरिता सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ.मीनल साळवी, सहयोगिनी सुप्रिया मोरे,आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी हाके, नर्स वनिता जाधव, प्राजक्ता चव्हाण, चांढवे गावचे सरपंच व महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

       आपल्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ.मीनल साळवी यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याकरिता कोणता आहार घ्यावा व सकस आहाराचे महत्व याविषयांवर उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

      आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी हाके यांनी अनेमिया म्हणजे नेमके काय, हिमोग्लोबिन कसे वाढवावे व परसबागेतून कोणत्या भाज्या घेऊ शकतो, ज्यातून महिलांचे आरोग्य सदृढ राहील यावर मार्गदर्शन केले. 

       या आरोग्य तपासणी शिबिरात महिलांचे हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, रक्तपेशी, थायराईड, वजन, उंची तपासणी करून महिलांना आरोग्यकार्ड देण्यात आले. त्यानंतर महिलांनी परसबागेत केलेल्या भाज्या पासून तिरंगा थाळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस वाटप करण्यात आले.  

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगिनी सुप्रिया मोरे यांनी केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिर नियोजनबध्द यशस्वी केल्याबद्दल दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, नर्स यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here