गणेशोत्सव विशेष: हिंदूंनो बनू नका भक्षक, आपल्या संस्कृतीचे आपणच व्हा ‘रक्षक, आपल्याला आपल्या ‘संस्कृती व सभ्यतेचा’ विसर पडलेला दिसतोय

अश्विन गोडबोले 

चंद्रपूर प्रतिनिधी

मो: 8830857351 

आपण कधी मुस्लिम’ बांधवांना ईदला अथवा त्यांच्या इतर सणांना मशिदीबाहेर ‘माझा झगा ग’ असे गाण लावून दारू पिऊन अश्लील हातवारे करून डीजेच्या तालावर थीरकतांना बघितल का? 

 

कधी ख्रिस्ती लोकांना येशुंच्या समोर शांताबाईच गाणं लावून तोंडात मावा (खर्रा) कोंबून नाचताना बघितलय का? 

 

कधी जैन धर्मियांना त्यांच्या मिरवणुकीत ‘आला बाबुराव आला’ गाणं लावून डिजे च्या तालावर थिरकताना बघितले का? नाहीना…

या सगळ्यांचे उत्तरं निश्चितच नकारार्थीच मिळणार.

हे सगळे समाज आपआपल्या देवतांचे, रूढी परंपरांचे, सभ्यतेचे पालन करुन जाणीवपूर्वक इमाने -इतबारे मानसन्मान ठेवतात. कारण त्यांना त्यांचा धर्म त्यांची संस्कृती, सभ्यता टिकवायची आहे! 

मग आमच्या हिंदू धर्मियांच्या देवांपुढेच डॉल्बी साऊंड आणि दारू पिऊन अश्लील हातवारे करून धांगडधिंगा गाणी लावून नंगानाच का? 

हा कलंक हिंदू सणांनाच का लागला आहे. की आपणच या दुर्दशेसाठी कारणीभूत आहोत याचा प्रत्येक हिंदू बांधवांनी आत्मविचार करावयाची नितांत गरज आहे.

डॉल्बीवर सिनेमांची अश्लील गानी लावून आपणच आपल्या हिंदू देवी-देवतांचा, हिंदू संस्कृतीचा अनादर करत आहोत हे ध्यानात घेतले पाहिजे. आपले सण हे मोठ्या उत्साहात व थाटात सोबतच मोठ्या प्रमाणात साजरे झालेच पाहिजेत पण त्यालाही काही गोष्टींची मर्यादा असून ते पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, ढोल ताशांचा गजर, सनईचे सुर, पारंपरिक पोशाखांचा रुबाब त्यात फेट्यांची शान या सगळ्यांची आपल्या हिंदूंच्या सणात जोड असायला हवी. तेव्हाच हिंदुंच्या सणांचे नामकरण होण्याला आळा बसेल.

गौरी गणपती, गोकुळाष्टमी, होळी, नवरात्र यांसारख्या हिंदू सणांना अनेक अश्लिल गाणी सर्रासपणे वाजविली जातात. पप्पी दे पप्पी दे पारुला…, आवाज वाढव डीजे तुझ्या आईची…., चिमणी उडाली भूर्रर…, पोरी जरा जपून दांडा धर…, झिंग झिंग झिंगाट…, शांताबाई.. शांताबाई… अशी गाणी हिंदू धर्मियांच्या उत्सव मिरवणुकींमध्ये वाजवून डॉल्बीच्या तालावर बेभान होऊन नाचणे जणू काही आजकाची प्रचलित पद्धतच झाली आहे. या कुपद्धतीला वेळीच आवर घालने गरजेचे आहे. असल्या प्रकारांनी आपल्या संस्कृतीचा अनादर होत असेल तर हिंदूंनी डोळेझाक न करता अश्या लोकांना वेळीच आरसा दाखविण्याची गरज आहे. असल्या फालतुगिरीला कडाडून विरोध करुन उत्सवांना देणग्या देतानाच मंडळांना आवर्जून सुचवावे की यावेळ पासून गणेश मंडपांमधून लाऊडस्पीकर चा आवाज मर्यादीत असावा, उत्सवात डॉल्बीवर कुठलीही चित्रपट गाणी वाजवायची नाहीत. त्याऐवजी फक्त धार्मिक श्लोक, मंत्रपठण, देशाभिमान जागृत करणारी गीते इत्यादी प्रसारीत करावी तेव्हाच आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ. आणि तरीही का तेथे जर सिनेमाची घाणेरडी गाणी वाजविण्यात आलीच तर त्याचा आम्ही कडाडून विरोध करु. अगदी गणेश विसर्जन मिरवणुकीत पण हा नियम सर्व मंडळांनी पाळायला हवा. 

लतादीदी,आशाताई, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अरूण दाते, सुधीर फडके, अजित कडकडे, सच्चिदानंद अप्पा यांसारख्या मातब्बर गायकांनी गायलेली भक्तिगीते व भावगीते जर सार्वजनिक उत्सव, मिरवणुकींमध्ये लावली तर आपल्या हिंदुंच्या संस्कृतीला जपण्यास मोठा हातभार लागून हिंदुंच्या सभ्यतेचे उत्कृष्ट सादरीकरण होईल यात तिळमात्र शंका नाही.

चला तर मग आपणच आपल्या संस्कृतीचे जतन करुन रक्षक बनून सभ्यतेचे एक उदाहरण निश्चित करूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here