बिबट्या प्राण्याबद्दल वनविभागाची बहिरोळे येथे जनजागृती

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080093301

रायगड :-गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे बिबट्याने अनेकांना दर्शन देत मानवीवस्ती जवळील कुत्रा इतर प्राण्यांची शिकार केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.यामुळे सकाळी व्यायामाच्या दृष्टीने चालत जाणारे,शाळेत व कॉलेजला जाणारी मुले,कामावर तसेच शेतावर जाणारे शेतकरी,कनकेश्वर येथे येणाऱ्या पर्यटक व भाविक यांच्यामध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले होते,यावर वनविभागाने सदर बिबट्यापासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावेत,असे निवेदन बहिरोळे ग्रामस्थांनी नुकतेच वनविभागाला दिले होते.

        काही प्रमाणात उपाययोजना म्हणून दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी यावर आधारित वनविभागाने बहिरोळे ग्रामस्थांसाठी जनजागृती पर कार्यक्रम RESQ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या संस्थेचे कार्यकर्ते नचिकेत उत्पात,नरेश चांडक यांच्यामार्फत आयोजित केला होता. यावेळी ग्रामस्थांना “बिबट्या वैरी नाही,शेजारी” या जनजागृतीपर चित्रफितीद्वारे बिबट्या व इतर वन्यप्राण्यांची माहिती देण्यात आली. बिबट्या या वन्यप्राण्यांच्या बाबतीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसरण करण्यात आले.तसेच बिबट्या या प्राण्याविषयी निर्माण झालेली भीती व गैरसमज कमी करण्यासाठी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाला बहिरोळे ग्रामस्थांसोबत मापगांव ग्रामपंचायत हद्दीतील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे, मापगांव तंटामुक्ती उपाध्यक्ष विवेक जोशी, चांदोरकर सर, राजेंद्र घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, पोलीस पाटील प्रफुल्ल थळे,युवा नेता सुचित थळे यांच्यासह वनविभागाचे वनपाल शिवाजी जाधव, दिपक मोकल, तुकाराम जाधव, वनरक्षक मौलेश तायडे, पंकज घाडी, सौरभ पाटील, स्नेहा म्हात्रे, वनमजुर जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here