रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील रेशनकार्ड गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी अलिबाग यांना निवेदन देवून केली कारवाईची मागणी

शहानवाज युनुस मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420506

रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील रेशनकार्ड गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी अलिबाग यांच्याकडे तक्रार दाखल.डॉ. पदमश्री. एस. बैनाडे (निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी) रायगड अलिबाग यांच्या कडे योग्य ती कारवाई होण्यासाठी निवेदन दिले आहे.

देवकान्हे गावात हिंदू कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये मुस्लिम व्यक्तींची नावे लागली आहेत. 35 ते 40 हिंदू कुटुंबातील रेशनकार्ड वर अशी नावे लागली असल्याने कोणतं रॅकेट तर नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे, सदर प्रकरणी सखोल चौकशी करावी, तसेच देवकान्हे गावातील गोरगरीब लोकांना चौकशी करून पुरवठा विभाग रोहा त्रास देत आहेत ज्याच्यावर कारवाई करायची आहे ते सोडून या गावातील गोरगरीब लोकांना पुरवठा विभाग चौकशी करत आहेत.

विशेष करून देवकान्हे गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना ह्या नोंदी झाल्या कशा ? त्याचा जाहीर निषेध भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर यांनी केला आहे व याची माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी मॅडम यांना दिली आहे.

रोहा तालुक्यातील देवकान्हे रास्त भाव दुकानदार यांचा गैरकारभार याबद्दल रास्त भाव धान्य दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकारी जे कोणी दोषी असतील याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टी रोहा च्या वतीने निवेदन आज भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर यांनी 

मा. जिल्हाधिकारी अलिबाग कार्यालय येथे निवेदन दिले.यामुळे तालुक्यातील रोहा रास्त भाव धान्य दुकानदार व पुरवठा विभाग रोहा यांच्यावर कारवाई ची टांगती तलवार निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here