कोकण मुंबईला जोडणारा रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा पुल बंद होणार, पर्यायी मार्गाची मागणी…

शहानवाज युनुस मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: कोकणात रायगड जिल्ह्यातील मुंबईला जोडणारा व मुरुड काशिद येथील पर्यटनासाठी महत्त्वाचा असलेला साळाव-रेवदंडा पुल दुरुस्ती मुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

  तर रत्नागिरी रायगडला जोडणारा आंबेत खाडीवरचा पुल दुसर्‍यांदा दुरुस्तीसाठी काढण्यात आल्याने या पुर्वीच बंद करण्यात आला आहे.

कोकणातील हे दोन्ही मोठे पुल हे तात्कालीन कॉंग्रेस नेते कै बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या कालावधीत बांधण्यात आले होते. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पुल नव्याने बांधण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार ने तात्काल लक्ष घालणे आवश्यक आहे.

   सदर चा बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कालावधीत बांधला गेला आसुन आज या पुलास अनेक वर्ष झाली आहे.

लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे या पुलाच्या दुरुस्तीसाठी सदर च्या पुलावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. सदर च्या पुलावरील वाहतुक बंद केल्याने अनेक स्थानिक नागरिक व पर्यटक याना मुरुड येथे येण्यास अशक्य होणार आहे.

या साठीच सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्वप्रथम लोकांना असणारी पर्यायी वाहतुक उपलब्ध करून द्यावी मगच पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

   सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी अनियमित कालावधीपर्यंत पुल बंद करीत असताना पर्यायी वाहतुक ही जलमार्ग हा एकमेव पर्याय ठरणार आहे, या साठी सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम खात्याने आंबेत खाडीवरील मोफत देण्यात आलेल्या जंगल जेट्टी प्रमाणे ही सुविधा साळाव ते रेवदंडा प्रवासी वर्गास मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

दररोज प्रवास करणारे विद्यार्थी,मासे विक्रेते,व्यापारी,रुग्णवाहिका,व असंख्य नोकरदार वर्ग आहे, याची सर्वप्रथम सुविधा करावी मगच पुल दुरुस्तीसाठी काढण्यात यावा अशी प्रमुख मागणी होताना दिसुन येते.

साळाव-रेवदंडा खाडी पुलाचे काम १९८६ मध्ये करण्यात आले आसुन पुलाची लांबी ५१० मीटर आहे. पुलाला बारा गाळे आहेत, या गाळ्याचे पिलर्स कमकुवत झाले आसल्याचे स्ट्र्क्टर ऑडिटमध्ये नमुद आसलेचे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here