पिण्याच्या पाण्यात आर्सेनिक, फ्लोराइड तसेच जमिनीतील घातक क्षारांचे प्रमाण वाढले
देशातील बहुतांश राज्यात जमिनीखालील पाणीसाठ्यात विषारी घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.असे संसदीय स्थायी समितीच्या अहवालात सांगण्यात आले आहे.भुजल मोठ्या प्रमाणात दुषित झाल्याने राज्य सरकारांनी याबाबत संशोधन वाढवावे आणि पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी अश्या सूचनाही संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात केल्या आहे.कारण पिण्याच्या पाण्यात आर्सेनिक,फ्लोराइड तसेच जमिनीतील इतर घातक क्षारांचे प्रमाण वाढले असल्याने राज्यांनी सतर्क रहावे, असेही आव्हान समितीने केले आहे.म्हणजेच यावरून स्पष्ट होते की.भुजलपातळी दिवसेंदिवस कमी होतच आहे सोबतच भूजलसाठा दूषित होत आहे ही बाब मानव, पशुपक्षी व संपूर्ण जीवजंतूसाठी व निसर्गासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मी समजतो.देशातील भूजलसाठ्यामध्ये आर्सेनिक फ्लोराइड तसेच जमिनीतील इतर घातक क्षारांचे प्रमाण वाढले असल्याने भूजलसाठा दुषित झालेला आहे.यावरून स्पष्ट होते की देशातील अनेक राज्यांतील भूजलसाठा प्रचंड प्रमाणात दूषित झाल्याचा अंदाज आहे.त्यामुळे देशातील संपूर्ण राज्यांनी वेळोवेळी भूजलपातळी व भूजलसाठ्याची तपासणी केलीच पाहिजे.देशातील वाढते कारखाने,वाढते शहरीकरण, परमाणु परिक्षण,मोठ्या प्रमाणात चाललेली जंगलतोड व वाढते प्रदुषण यामुळे पृथ्वीचे संतुलन दिवसेंदिवस ढासळत आहे.या संपूर्ण कारणांमुळे भूजलपातळी दिवसेंदिवस कमी होतांना आपण पहातो. त्यामुळेच आज भूजलसाठा दुषित होतांना दिसतो.पुर्वी विहीरीच्या पाण्याची पातळी 50 ते 60 फुटांपर्यंत असायची आणि या खोलीपर्यंत विहीरीला भरपूर मुबलक पाणी असायचे.परंतु आज मानवजातीने स्वतःच्या स्वार्थासाठी भूजलसाठ्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून येते.
आज पाण्यासाठी 1000 फुट खोलवर जाऊन आपण पाणी काढत आहोत.म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेल्या पाण्याची मर्यादा सुध्दा आपण ओलांडली असून पाताळातुन म्हणजे देवलोकातुन आपण पाणी आणत आहोत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.पाताळातील पाण्यावर आपला तिळमात्र अधिक नाही तरीही आपण अतिक्रमण करीत आहोत हे मानवजातीचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.अशाप्रकारच्या मानवाच्या अतिक्रमणामुळे भूजलपातळी कमी होतच आहे सोबतच दुषित सुध्दा होत आहे.यावर तातडीने उपाययोजले नाही तर यांचा गंभीर परिणाम आपणा सर्वांना भोगावेच लागतील हेही तितकेच सत्य आहे.भूजलसाठ्यावर मानवाने फक्त अतिक्रमणच केले नसुन भूजलसाठा दुषित करण्याचे सुध्दा घृणीत काम केले आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. कारण देशातील नदी-नाले,तलाव, बंधारे,समुद्र यात मोठ्या प्रमाणात कारखान्यांचे व इतर दुषित पाणी जात असल्यामुळे हे संपूर्ण पाणी जमिनीत मुरून जमिनीच्या तळापर्यंत जाते.यामुळेच देशातील भूजलसाठा दिवसेंदिवस दुषित होतांना दिसतो. सोबतच मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणामुळे भूजलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.याचे अत्यंत गंभीर परिणाम मानव, पशुपक्षी व संपूर्ण प्राणीमात्रांना व जीवजंतूंना भोगावे लागतील आणि आपण आजही भोगत आहोत यावर देशातील संपूर्ण राज्यांनी व केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा याचे अत्यंत भयावह परिणाम पृथ्वीतलावर रहाणाऱ्यांना भोगावे लागतील.त्यामुळे सरकारने भुजलपातळी कमी होणे व दुषित होणे यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.भुजलपातळी वाढविण्याचे व शुद्ध करण्याचे काम मुख्यत्वेकरून झाडांमुळे व त्यांच्या मुळांमुळे होत असते.परंतु आपण त्यावरच कुह्राड चालविली तर जखमा पृथ्वीला होईल व त्यांचे प्रायश्चित पृथ्वीवर रहाणाऱ्या तळागाळातील सर्वांनाच गंभीरपणे भोगावे लागतील.अशा परीस्थितीत कोण्हीही कोणाला वाचवु शकणार नाही.या संपूर्ण गोष्टींचा सरकारने गांभीर्याने विचार करावा व ताबडतोब भूजलसाठा वाचविण्याकडे व भूजलसाठा दुषित होत आहे त्याला रोखण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत.या कार्यासाठी सोबत सामाजिक संस्था, एनजीयो यांचे सुध्दा सहकार्य घ्यावे.जमिनीखालील पाणीसाठ्यात विषारी घटक जाण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतीमध्ये वापरण्यात येणारे रासायनिक खतांचा वापर,मेलेली जनावरे खाण्याचे काम गिधाड करतात परंतु गिधाडांची घटती संख्या यामुळे सुध्दा भुजल दुषित होत आहे, जमिनीत मुरणारे दुषित पाणी व स्थल,जल, वायू यातील वाढते प्रदुषण याचा संपूर्ण परिणाम जमिनीतील भूजलसाठ्यात विष घोळण्याचे काम करीत आहेत.देशात व अनेक राज्यात वाढलेली दूषित भूजलपातळी यामुळे नागरिकांमध्ये कर्करोग,ह्रदयविकार, मधुमेह, त्वचारोगासारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे.अनेक भागातील भूजलात आर्सेनिक,फ्लोराइड आणि इतर घातक क्षारांची पातळी वाढल्याचे गांभिर्य लक्षात घेऊन राज्यांनी त्याबाबत तालुका, जिल्हावार संशोधन करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सुचना समितीने केल्या आहेत.या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी नीती आयोग, दिल्ली विद्यापीठ, केंद्राचा उच्चशिक्षिण विभाग, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, आरोग्य संशोधन विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग, विविध आयआयटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, नॅशनल रिसर्च फाउंडेशन,आयसीएमआर आदी संस्थांच्या प्रतिनिधींची मतेही समितीने जाणून घेतली.यावरून आपण सहज समजू शकतो की भूजलसाठा दूषित होणे देशासाठी व पृथ्वीवर राहणाऱ्यांसाठी कीती भयानक समस्या निर्माण करू शकते.त्यामुळे यावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात सोबतच वृक्षलागवडीवर जास्तीत जास्त भर द्यावा, शहरीकरण व औद्योगिकरण यावर नियंत्रण आणावे, मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड ताबडतोब थांबवावी यामुळे निसर्ग संतुलीत रहाण्यास मोठी मदत होईल व भूजलसाठ्यावर याचा चांगला परिणाम दिसून येईल.
रमेश कृष्णराव लांजेवार
मो: 9921690779