नागपूर मध्ये 24 वर्षीय सैनिकांची आत्महत्या; पाच महिन्यांपूर्वीच झाले लग्न.

✒️युवराज मेश्राम,नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒️
नागपुर,दि.29 एप्रिल:- नागपुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतील सैन्य सेवेतील अवघ्या 24 वर्षाच्या सैनीकाने गळफास लाऊन आत्महत्या करुन आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नागपुरात घडली आहे.

नागपूर शहरातील कामठी येथे असल्याल्या सैन्य छावणीतील परिसरात असलेल्या शौचालयाच्या खिडकीला शॉल बांधून या 24 वर्षीय सैनिकाने आत्महत्या केली आहे. नवीन राम निवास वय 24 वर्ष असे आत्महत्या केलेल्या सैनिकाचे नाव आहे. नवीन राम निवास हा सैन दलातील अर्जुन स्पोर्ट्स कंपनीत तैनात होता. तो बास्केटबॉल खेळाडू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन राम निवास हा तरुण सैनिक स्पोर्ट्स कोट्यातून तो सैन्य दलात भरती झाला होता. पाच महिन्यांपूर्वीच नवीन राम निवास याचे लग्न झाले होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास शौचालयात गेला आणि तो कधी परतलाच नाही. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास तो सैन्य दलाच्या ‘गिनती’ ला हजर झाला नाही. तो अनुपस्थित असल्याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर अधिकारी त्याच्या घरी गेले. तो घरी नव्हता. अधिकाऱ्यांनी शौचालयाची तपासणी केली असता नवीन हा गळफास लावलेला दिसला.

या घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एन. ए. मदनकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून त्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला आहे. नवीन याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. जुनी कामठी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here