8 मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा.

8 मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा.

8 मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा.

✍विठ्ठल ममताबादे ✍
उरण तालुका प्रतिनिधी
मो. नं.9702751098

उरण (रायगड)दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि 8 मे 2022 रोजी सर्वेश मंगल कार्यालय, ताई पिंगळे चौक, डोंबिवली(पूर्व),(डोंबिवली रेल्वे स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर )येथे वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजातीतील तसेच जंगम समाजातील बंधु भगिनींणी आपल्या उपवर मुला/मुलींसोबत हजर रहावे. कार्यक्रमाची नोंदणी 11 ते 1 या वेळेत मेळाव्याच्या ठिकाणीच होईल. व लगेचच दुपारी 1 वाजता मेळावा सुरु होईल. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी अध्यक्ष शांतकुमार लच्याने फोन नंबर -7719822994, उपाध्यक्ष बसवंतराव.डी. अळगी -9664142412, कार्याध्यक्ष प्रदीप निलाखे -9833589773 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने तसेच उरण तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here