मोबाईलसाठी मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, ता. २८ : शहरातील एका अकरा वर्षांच्या मुलाने मोबाईल बघू दिले नाही, शाळेत जाण्याची इच्छा नसल्याच्या कारणावरून स्वताच्या अपहरणाचा डाव रचला. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर त्याने सांगितलेले उत्तराने पोलिसही चक्रावून गेले. मोबाईलसाठी आपण अपहरणाचा बनाव केला असल्याचे सांगितले.

शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो मोबाईलवर गेम खेळत होता. त्यामुळे वडीलाने त्याला हटकले. त्याचा राग त्याने मनात ठेवून शाळेत जात असतानात त्याने स्वतःच्याअपहरणाचा डाव रचला. काही लोकांनी पेढा खायला दिला. मी तो खाल्ला नाही. त्यामुळे त्या लोकांनी तोंडावर रुमाल बांधून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, अशी कहाणी त्याने शाळेत सांगितली 

शाळेतून त्याच्या घरी संपर्क साधण्यात आला. त्याचे वडील शाळेत आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून घटना सांगितली. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत मुलाने दाखविलेल्या जागेवरील सीसीटीव्ही फुटेज बघितले. मात्र, त्यात असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे दिसून आले. काही वेळाने पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलाने खरी हकीकत सांगितली.

मोबाईल बघू दिला नसल्याने आणि मला शाळेत जायचे नव्हते या कारणाने आपण असा बनाव केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आजच्या टेक्नॉलॉजीच्या या युगात लहान मुलांवर लक्ष देणे अतिशय गरजेचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here