good-positive-changes-happened-in-the-world
कोरोनाग्रस्त २०२१ वर्षात जागतिक पर्यावरणामध्ये झालेल्या सकारात्मक सुधारणा
good-positive-changes-happened-in-the-world
कोरोनाग्रस्त २०२१ वर्षात जागतिक पर्यावरणामध्ये झालेल्या सकारात्मक सुधारणा

सिद्धांत
२९ डिसेंबर २०२१: २०२१ वर्षाची सुरुवात अनेक काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या तर काही देशांमध्ये तिसऱ्या लाटेने सुरुवात झाली. जगभरातील अनेक देश प्रदीर्घ लॉकडाऊन मध्ये अडकून पडले. लाखो लोकांनी कोरोनामुळे आपला प्राण गमावले.

२०२१ वर्षात नैसर्गिक आपत्तीनी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी घडवून आणली. अमेरिका आणि युरोपमधील जंगले महिनाभर वनव्यामध्ये धुमसत होती. कॅनडासारख्या बर्फाळ प्रदेशातील देशामध्ये उष्ण तापमानाची तीव्र लाट आली. आफ्रिकेतील सुदान देशाला ६० वर्षातील सर्वात मोठ्या पुराला तोंड द्यावे लागले. हैती देशातील भूकंपामध्ये जवळपास २२०० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारत, फिलिपिन्स सारख्या देशांमध्ये भयानक सायक्लोन्स आणि पुरांसारख्या घटनांनी हजारो कुटुंबाना उध्वस्त केले.

पण जागतिक पातळीवर पृथ्वीच्या पर्यावरणात काही सकारात्मक बदलसुद्धा घडून आले. लॉकडाऊनच्या दरम्यान मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर आलेले डॉल्फिन आणि शुद्ध हवामानामुळे शेकडो किलोमीटर अंतरावरून दिसणारी हिमालयाची हिमशिखरे, याबाबत आपण साऱ्यांनी ऐकलं असेलच.

ऑस्ट्रलियातील ग्रेट बॅरियर रीफ:

great-barrier-reefs
ऑस्ट्रलियातील ग्रेट बॅरियर रीफ

ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळच्या ग्रेट बॅरियर रीफमध्ये निरनिराळे सागरी प्राणी, विविध प्रकारच्या प्रवाळांच्या सुंदर नैसर्गिक बागा, सागरी वनस्पती आढळून येतात. येथे प्रवाळांच्या रंगीबेरंगी ४०० हुन जास्त प्रजाती पाहायला मिळतात. परंतु वाढत जाणाऱ्या सागरी तापमानामुळे ग्रेट बॅरियर रीफवर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या तीन दशकात जगातील ७५% जास्त कोरल रीफ नष्ट झाले आहेत. परंतु ह्या वर्षी शास्त्रद्यांनी शोधून काढलेल्या “कोरल आयव्हिफ” या तंत्रज्ञानामुळे अनेक नव्या कोरल रीफना तयार करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे कोरल रिफ पूर्णतः नाहीश्या होण्याचा धोका काही अंशी टळला आहे.

पांडा प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवण्यात चीनला यश:

panda-population-in-china-increses
पांडा प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवण्यात चीनला यश

काही वर्षांपूर्वी जायंट पांडाची चीन मधील संख्या घटत चालली होती. परंतु चीन प्रशासनाकडून देशभरात पांडा प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ठीक-ठिकाणी संरक्षित क्षेत्र तयार करून देशाच्या १८% भूभागाला पांडा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. आज चीनच्या जंगलात १८०० हुन जास्त पांडा राहत असून त्यांची संख्या पुन्हा एकदा योग्य रीतीने वाढत आहे.

ओझोनचा थर सुधारतोय

ozon-layers-filling-up-again
ओझोनचा थर भरतोय

पृथ्वीच्या भोवताली असलेल्या ओझोनचा थर आपल्या साऱ्यांचे अवकाशातील धोकादायक युव्ही किरणांपासून संरक्षण करतो. ह्या ओझोनच्या थरामध्ये नॉर्थ अमेरिका खंडाच्या आकाराइतका छिद्र असल्याच आपल्या सगळ्याचं माहित असावं. ह्या वर्षी अमेरिकेच्या एनसिएआर संस्थेच्या निरक्षणांनुसार ते छिद्र भरत असल्याचे आढळून आले आहे. ओझोनच्या थराला धोका पोहचवणाऱ्या केमिकलच्या वापरावर नियंत्रण मिळवण्याचा १९८७ चा मॉन्ट्रिअल प्रोटोकॉल ठराव युनाइटेड नेशनमधील देशांनी पास केला. त्याचा सकारात्मक परिणाम सध्या दिसत असून, दर १० वर्षांनी ओझोनच्या थरात तीन टक्क्यांनी सुधारणा होत आहे.

२०२१ साली झाले रिन्यूएबल एनर्जीचे विक्रमी उत्पादन:

production-of-renewable-energy
२०२१ साली झाले रिन्यूएबल एनर्जीचे विक्रमी उत्पादन

२०२१ साली जगभरात २९० गिगावॉट्स रिन्यूएबल एनर्जीचे उत्पादन करण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा,जिओथर्मल यासारख्या ऊर्जाप्रकारांचा समावेश आहे. रिन्यूएबल एनर्जी उत्पादनामध्ये चीनचा प्रथम क्रमांक, तर अमेरिकेचा दुसरा क्रमांक येतो. भारत या यादीत ब्राझील नंतर चौथ्या क्रमांकावर आहे. जागतिक तापमान आणि पर्यावरण बदलाला नियंत्रित करायचे असल्यास जास्तीत जास्त रिन्यूएबल एनर्जीचे उत्पादन आणि वापर करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here